मोठी बातमी! मुंबईत महापौर कोणाचा? भाजप की शिवसेनेचा, अखेर एकनाथ शिंदेंनी पत्ते ओपन केले
मुंबई महापालिकेत भाजपला मोठं यश मिळालं आहे, मात्र तरी देखील त्यांना स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही, यावर बोलताना आता उपमुख्यमंत्री एकाथ शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे.

महापालिका निवडणुकीचा निकाल लागला आहे, महाराष्ट्रात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाला देखील राज्यात चांगलं यश मिळालं आहे. दरम्यान मुंबईमध्ये मात्र परिस्थिती वेगळी आहे. मुंबईमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. मुंबईमध्ये भाजपचे 89 नगरसेवक निवडून आले. मात्र तरी देखील भाजपला स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेत शिवसेना शिंदे गटाला 29 जागा मिळाल्या आहेत, त्यामुळे आता मुंबईत महापौरपदासाठी भाजपला शिवसेना शिंदे गटाची मदत लागणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार शिवसेना शिंदे गटानं भाजपकडे अडीच वर्ष महापौरपदाची मागणी केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले सर्व नगरसेवक हॉटेलमध्ये नेऊन ठेवले आहेत.
दरम्यान आज एकनाथ शिंदे यांनी नव्या नगरसेवकांची भेट घेतली, त्यांना मार्गदर्शन केलं, त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी मुंबईच्या महापौरपदाबाबत मोठं विधान केलं आहे. मुंबईचा नवा महापौर केणाचा होणार? शिवसेना शिंदे गट की भाजपचा याबाबत सर्वांनाच मोठी उत्सुकता आहे, या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी मुंबईत महायुतीचा महापौर होईल असं म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले शिंदे?
मुंबईच्या बालेकिल्ल्यात 29 नगरसेवक निवडून आणले आहेत. त्यात 19 लाडक्या बहिणी आहेत. लोकांनी आम्हाला स्वीकारलं आहे. शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद आणि मोदींच्या मार्गदर्शनामुळे आमचा मोठा विजय झाला आहे. मुंबईचा महापौर महायुतीचाच होईल, ठाणे, डोंबिवली, उल्गासनगर या सर्व ठिकाणी देखील महायुतीचाच महापौर होईल असं यावेळी शिंदे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान शिवसेनेने घाबरून नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवलं, अशी विरोधकांकडून टीका सुरू आहे, या टीकेला देखील एकनाथ शिंदे यांनी यावेळी उत्तर दिलं. शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? शिवसेनेलाच लोक घाबरतात. सर्व नगरसेवक आहेत. एकमेकांची ओळख व्हावी. काम कसं करायचं हे सांगायचं आहे. जुने नगरसेवक आहेत. त्यांचं मार्गदर्शन होतंय. प्रस्ताव कसे तयार करायचे. निधीची प्रोव्हिजन कशी असते. हे त्यांना समजू द्यायचं होतं. मला यांना भेटायचं होतं. म्हणून सर्व एकत्र आलो, असं यावेळी शिंदे यांनी म्हटलं.
