AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kolhapur corona death rate : कोल्हापूरचा मृत्यूदर देशात सर्वाधिक, 3 कारणं समोर

कोल्हापुरातील कोरोना मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक कसे, असा सवाल उपस्थित होत आहे. याबाबत टास्क फोर्सचा प्राथमिक निष्कर्ष समोर आला आहे. (Why Kolhapur Covid Patient Death rate is high Task Force explained the reason)

Kolhapur corona death rate : कोल्हापूरचा मृत्यूदर देशात सर्वाधिक, 3 कारणं समोर
Covid 19 bodies
| Updated on: May 13, 2021 | 12:10 PM
Share

कोल्हापूर : कोरोनाच्या उद्रेकाने देशासह महाराष्ट्रात मृतांचे खच पडत आहेत. महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात तर देशातील सर्वाधिक मृत्यूदर आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. मात्र कोल्हापुरातील कोरोना मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक कसे? असा सवाल उपस्थित होत आहे. याबाबत टास्क फोर्सचा प्राथमिक निष्कर्ष समोर आला आहे. (Why Kolhapur Covid Patient Death rate is high Task Force explained the reason)

कोल्हापुरातील मृत्यूदर सर्वाधिक का?

पहिले कारण –  टास्क फोर्सने दिलेल्या माहितीनुसार, सध्या कोल्हापुरात अनेक कोरोनाबाधित रुग्ण हे घरीच उपचार घेत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच घरी त्रास वाढू लागल्यानंतर अनेक रुग्ण हे उपचारासाठी रुग्णालयात दाखल होत आहे. मात्र तोपर्यंत बराच कालवधी निघून गेलला असतो. परिणामी कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू होत आहे.

दुसरे कारण –  तर दुसरीकडे कोल्हापूर शहरातील आणि ग्रामीण भागातील नागरिकांचा बेफिकीरपणा कमी झालेला नाही. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग गावागावात झपाट्याने पसरु लागला आहे. यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील कोव्हिड सेंटर कमी पडत आहेत. तसेच व्हेंटिलेटर, ऑक्सिजन या सुविधाही कमी पडत आहे. त्यामुळेही मृत्यूदरात वाढ होत आहे.

तिसरे कारण –  त्याशिवाय कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच रुग्णालय सध्या हाऊसफुल्ल झाले आहेत. त्यामुळे वेळीच उपचार न मिळाल्यामुळे काही रुग्णांचा मृत्यू होत आहे, असेही कारण टास्कफोर्सने दिले आहे.

कोल्हापुरातील टास्क फोर्स यांनी दोन दिवस जिल्ह्यामध्ये रुग्णालयांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील करोना मृत्यूदर कमी करण्यासाठी काही तपशील गोळा केला. तसेच कोल्हापुरातील छत्रपती प्रमीलाराजे रुग्णालय (सीपीआर) व इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयाची पाहणी केली.

टास्कफोर्सकडून सूचना

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मृत्यूदर वाढत असल्यामुळे प्रशासनासमोर मोठी चिंता वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर येत्या 15 दिवसातील कोरोना मृत्यूचा दर 30 ते 40 टक्क्याने कसा कमी करता येईल, याबाबत सूचना दिली जाणार आहे. तसेच टास्क फोर्सकडून यावर सुधारणा सुचवण्यात येणार आहे.

कोल्हापुरातील कोरोना बळींचा एकूण आकडा 

कोल्हापूर ग्रामीण – 1412 कोल्हापूर नगरपालिका – 466 कोल्हापूर महापालिका 613 इतर जिल्हे – 349

एकूण मृत्यू – 2840

(Why Kolhapur Covid Patient Death rate is high Task Force explained the reason)

संबंधित बातम्या : 

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढता, पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रासह दहा राज्यातील 54 जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद

कोरोनामुळे पिता-पुत्राचा एकाच दिवशी मृत्यू, गावाचा आणि कुटुंबाचा आधार हरपला

Corona Cases in India | देशात कोरोनाग्रस्तांची संख्या पुन्हा साडेतीन लाखांच्या पार, कोरोनाबळीही 4100 वर

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.