AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अबू आझमी एवढे का संतापले? एका ट्विटमुळे मविआत मोठी फूट, काय आहे नेमकं प्रकरण

राज्यात मंत्रिमंडळाच्या शपथविधिनंतर आजपासून सुरू झालेल्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशीच महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. समाजवादी पार्टीने मविआतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

अबू आझमी एवढे का संतापले? एका ट्विटमुळे मविआत मोठी फूट, काय आहे नेमकं प्रकरण
| Updated on: Dec 07, 2024 | 4:50 PM
Share

विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. समाजवादी पार्टीने मविआतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सपाचे आमदार अबू आझमी यांनी घोषणा केली आहे. त्यांनी यावेळी बोलताना महाविकास आघाडीवर गंभीर आरोप देखील केले आहेत. अबू आझमी यांनी उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की आमचं हिंदुत्व कायम असेल, त्यांनी सर्वांना सोबत घेउन चालण्याची भूमिका मांडली नाही, त्यामुळे आता काँग्रेस, राष्ट्रवादीनं ठरवायचं आहे की,  त्यांच्यासोबत राहायचं की नाही राहयचं असंही यावेळी आझमी यांनी म्हटलं आहे. दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर यांनी सहा डिसेंबरला बाबरी मशिदीसंदर्भात एक ट्विट केलं होतं, त्या ट्विटनंतर आता हा वाद आणखी चिघळला आहे.

नेमकं काय म्हणाले आझमी? 

महाविकास आघाडी सेक्युलर होती, हिंदू, मुस्लिमांमध्ये कुठलाच फरक केला जात नव्हता.  मात्र निवडणूक होताच उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट मत मांडलं की आम्ही हिंदुत्वाच्या भुमिकेवर ठाम आहोत. आपल्या लोकांनी हिंदुत्व घेऊन चलावं. राजकारणात धर्म आणणं ही चुकीची गोष्ट आहे. सहा डिसेंबरला आम्ही काळा दिवस म्हणून साजरा करतो. बाबरी मशिद त्या दिवशी तोडण्यात आली. उद्धव ठाकरे म्हणतात की ज्या शिवसैनिकांनी हे केलं त्यांचं आम्ही स्वागत करतो. असे वक्तव्य करणारे उद्धव ठाकरे जर सोबत असतील तर अशा आघाडीमध्ये समाजीवादी पार्टी राहाणं शक्यत नाही, असं अबू आझमी यांनी म्हटलं आहे.

ते पुढे बोलताना म्हणाले की, नाना पटोले आणि शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया द्यायला पाहिजे होती. महाविकास आघाडी सेक्युलर आहे की सांप्रदायिक हे स्पष्ट करायला पाहिजे होतं. त्यामुळे त्यांना काय निर्णय घ्यायचा ते घेऊद्यात पण आमचा पक्ष सेक्युलर आहे, त्यामुळे तो सांप्रदायिक पक्षासोबत राहणार नाही. ज्यांनी अशाप्रकारचं वक्तव्य केलं त्यांच्यासोबत राहणं शक्य नाही अशी प्रतिक्रिया अबू अझमी यांनी दिली आहे.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना