AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! शिवसेना-भाजप वेगवेगळी लढणार? त्या प्रश्नावर CM फडणवीसांचं मोठं विधान काय?

CM Devendra Fadnavis : शिवसेनेच्या काही नेत्यांनी आगामी काळात स्वबळावर लढण्याची भाषा केली आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उत्तर दिले आहे.

मोठी बातमी! शिवसेना-भाजप वेगवेगळी लढणार? त्या प्रश्नावर CM फडणवीसांचं मोठं विधान काय?
CM Fadnavis on ShirsatImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 02, 2026 | 6:35 PM
Share

गेल्या काही काळापासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. 2019 साली शिवसेना आणि भाजपची युती तुटली होती, मात्र 2022 साली एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. शिंदेंनी भाजपला सोबत घेत सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर अजित पवारांनीही राष्ट्रवादीतून बाहेर पडत सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला होती. त्यानंतर महायुतीने 2024 च्या विधानसभा निवडणुकीत दमदार विजय मिळवला होता. मात्र आता आगामी काळात महायुतीत फूट पडण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेच्या काही नेत्यांनी आगामी काळात स्वबळावर लढण्याची भाषा केली आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उत्तर दिले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

2029 साली शिवसेना भाजप वेगवेगळे लढणार?

छत्रपती संभाजीनगरमधील पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले की, ’29 मध्ये भाजप किंवा शिवसेना स्वतंत्र लढू शकते. आपण शिवसेना भाजप युती तुटताना पाहिलेलं आहे. कधीही कुणाचेही कोणतेही शाश्वत राजकारण नसते. अनेक युती अशा झाल्या की, कधी स्वप्नातही त्या होऊ शकल्या नसत्या. आपला पक्ष मजबूत करणे हा सर्वात मोठा उपाय आहे. आमची भूमिका महायुती सोबत लढायची आहे, ताकद विभागाला नको.’

पक्ष वाढवण्याचा सर्वांना अधिकार

यानंतर मंत्री उदय सामंत यांनीही सकारात्मक विधान केले होते. प्रत्येक पक्षाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. मित्रपक्ष असला तरी आणि विरोधक असला तरी पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. संजय शिरसाट पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने बोलले त्यांना पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे असं विधान केले होते. त्यामुळे शिवसेना भाजप वेगळे होणार याबाबत चर्चा रंगल्या होत्या. आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

मुख्यमंत्री फडणवीस यांना शिवसेना भाजप 2029 साली वेगवेगळे लढणार याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना मुख्यमंत्री यांनी, ‘मला असं वाटतं की शिवसेनेमध्ये बोलण्याचा अधिकार हा केवळ एकनाथ शिंदे यांना आहे. त्यांनी याबाबत एखादं विधान केलं तर मला तुम्ही त्यावर विचारा, इतर लोक बोलले तर त्याबद्दल आमच्या प्रवक्त्यांना विचारा’ असं म्हणत या मुद्द्यावर बोलण्यास नकार दिला आहे.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं