पेण-अलिबाग रोडवर पिकअप व्हॅनने दोन महिलांना उडवलं, एक ठार तर एक जखमी

अपघातात प्रेरणा पवार यांचा जागीच मृत्यू झाला आहे. जखमी सुशीला आग्रे यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे (Woman death in accident at Pen alibaugh road).

पेण-अलिबाग रोडवर पिकअप व्हॅनने दोन महिलांना उडवलं, एक ठार तर एक जखमी

रायगड : अलिबाग-पेण रस्त्यावर वाडगाव गावानजीक एका पिकअप व्हॅनने दोन महिलांना धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात एक महिला जागीच ठार झाली असून दुसरी महिला गंभीर जखमी आहे. सुशीला वसंत आग्रे आणि प्रेरणा प्रदीप पवार असे या अपघातग्रस्त महिलांची नावे आहेत (Woman death in accident at Pen alibaugh road).

या अपघातात प्रेरणा पवार यांचा जागीच मृत्यू झाला आहे. जखमी सुशीला आग्रे यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, पिकअप व्हॅनचालक प्रजापती याला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

अलिबाग येथे सुशीला वसंत आग्रे, प्रेरणा प्रदीप पवार या घरकामासाठी गेल्या होत्या. तेथून परतताना वाडगाव नजीक हा अपघात घडला. पिकअप व्हॅन (एमएच 06/ बीडब्लू 1653) चुकीच्या मार्गाने आल्याने हा अपघात घडला.

अपघाताची माहिती कळताच ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले. ग्रामस्थानी त्वरित रुग्णवाहिका बोलवून जखमी सुशीला यांना रुग्णालयात पाठवले. तर मयत प्रेरणा यांचा मृतदेहही रुग्णालयात पाठविला. चालक प्रजापती याला ग्रामस्थानी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

मयत प्रेरणा पवार यांना दोन जुळी मुले आणि एक मुलगा असे तीन मुले आहेत. तर पती, सासू सासरे असा परिवार आहे. या अपघातामुळे प्रेरणा यांच्या तिन्ही मुलांच्या डोक्यावरील आईचे छत्र हरविल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे (Woman death in accident at Pen alibaugh road).

दरम्यान, आज दुपारी जळगावमध्ये देखील अपघाताची घटना घडली आहे. दुचाकी घसरल्याने ट्रकच्या चाकाखाली येऊन दुचाकीस्वार पिता-पूत्र जागीच ठार झाले आहेत. हा भीषण अपघात (Accident) आज (मंगळवारी) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात असलेल्या नेरी गावाजवळ घडला. या अपघाती घटनेचा पोलीस तपास सुरू असून दोन्ही मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचं सांगण्यात येत आहे.

संबंधित बातमी : ऐन दिवाळीत पिता-पत्राचा अपघाती मृत्यू, ट्रकच्या चाकाखाली आल्यानं जागीच गमावले प्राण

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI