Yavatmal Crime | पाच दिवसांनंतर चोरट्यांची बँकेत पुन्हा एन्ट्री, यवतमाळात बँकेचा हलगर्जीपणा?

पेट्रोलिंग करणारे पोलिसांचे वाहन दोनदा त्या ठिकाणाहून गेले. मात्र चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत पोलिसांचे वाहन जाताच बँकेत प्रवेश केला. यावेळी दोन चोरटे पाळतीवर असल्याचे एका सीसीटीव्हीत कैद झाले आहे. पाच दिवसांपूर्वी बँक ऑफ महाराष्ट्रमधून चोरट्यांनी साडेचार लाखाची रोख लंपास केली होती.

Yavatmal Crime | पाच दिवसांनंतर चोरट्यांची बँकेत पुन्हा एन्ट्री, यवतमाळात बँकेचा हलगर्जीपणा?
पाच दिवसांनंतर चोरट्यांची बँकेत पुन्हा एन्ट्रीImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: May 22, 2022 | 2:25 PM

यवतमाळ : शहरातील मुख्य बाजार पेठ असलेल्या मेनलाईन परिसरातील बँक ऑफ महाराष्ट्रची (Bank of Maharashtra) शाखा पाच दिवसांपूर्वी चोरट्यांनी फोडून तब्बल साडेचार लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. त्यानंतर चक्क आज पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी पुन्हा बॅंकेत प्रवेश करीत चोरीचा प्रयत्न केला. मात्र लॉकर उघडण्यात अपयश आल्याने चोरट्यांनी त्या ठिकाणाहून पळ काढला. बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पाच चोरटे कैद झाले आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता शहर ठाणेदार नंदकुमार पंत (Thanedar Nandkumar Pant), एलसीबीतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहाणी केली. शहरातील मेनलाईन परिसरातील (Mainline Premises) बँक ऑफ महाराष्ट्रसमोर दोन चोरटे तब्बल अर्धातास अंधारात बसून होते. त्या ठिकाणी चोरट्यांनी अंगावरील कपडेही बदलून कलरींगच्या कामाचे परिधान केले.

पोलीस पेट्रोलिंगवर, चोरांनी घेतला अंधाराचा फायदा

पेट्रोलिंग करणारे पोलिसांचे वाहन दोनदा त्या ठिकाणाहून गेले. मात्र चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत पोलिसांचे वाहन जाताच बँकेत प्रवेश केला. यावेळी दोन चोरटे पाळतीवर असल्याचे एका सीसीटीव्हीत कैद झाले आहे. पाच दिवसांपूर्वी बँक ऑफ महाराष्ट्रमधून चोरट्यांनी साडेचार लाखाची रोख लंपास केली होती. यावेळी बँकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधिकारी, कर्मचारी त्या ठिकाणी दाखल झाले.

ठोस पुरावा लागला नाही

यावेळी पोलिसांना त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्याचे आढळले. त्याचबरोबर सायरनदेखील बंद असल्याचे समोर आले होते. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांना सुरक्षेबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे ही दुसरी घटना घडल्याचे बोलल्या जात आहे. शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेली बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा पाच दिवसांत दोनदा चोरट्यांनी फोडली. एवढेच नव्हे तर दोन्ही वेळा चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. त्यामुळे या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान पोलिसांसमोर येवून ठेपले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता बँकेत फिंगरप्रिंट एक्सपर्ट, श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे. मात्र ठोस सुगावा लागला नव्हता.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.