AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yavatmal : खदानीच्या डबक्यात बुडून मायकेलाचा दुर्दैवी मृत्यू, यवतमाळमधील हृदयद्रावक घटना

मुलाला डबक्यात बुडताना पाहून रुपालीनेही पाण्यात उडी घेतली.

Yavatmal : खदानीच्या डबक्यात बुडून मायकेलाचा दुर्दैवी मृत्यू, यवतमाळमधील हृदयद्रावक घटना
बंधाऱ्यात पोहताना तरुणाचा बुडून मृत्यूImage Credit source: Google
| Edited By: | Updated on: Jul 27, 2022 | 1:14 PM
Share

यवतमाळ : यवतमाळमध्ये मायकेलाचा बुडून मृत्यू (Yavatmal drown Death) झाल्याच्या हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जातेय. शेतात कामासाठी हे आई आणि मुलगा यवतमाळमध्ये (Yavatmal News) आले होते. खदाणीच्या डबक्या कपडे धुण्यासाठी आई आणि मुलगा गेले होते. अंघोळ करुन येतो, असं म्हणत मुलगा आईला सांगून खदाणीच्या डबक्यातील पाण्यात उतरला. मुलगा बुडतोय हे पाहून काय करावं आईला सुचलं नाही. मुलाला वाचवण्यासाठी आईनेही पाण्यात उडी घेतली. पण मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात असताना आईचाही बुडून मृत्यू (Mother Son died) झाला. नाकातोंडात पाणी जाऊन दोघेही गुदमरले आणि दोघांचाही पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला. मूळचं नांदेडचं असलेलं हे कुटुंब कामासाठी यवतमाळमध्ये आलं होतं. पण आई मुलाच्या मृत्यूने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ही घटना कळल्यानंतर महिलेच्या पतीला मोठा धक्काच बसला.

नांदेडहून शेतीसाठी आले होते, पण…

यवतमाळच्या करळगाव येथे गिट्टी खदानीच्या डबक्यात बुडाल्याने मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रुपाली शिंदे आणि भोला असे मृत मायलेकाचे नाव आहे. मूळचे नांदेडच्या इस्लामपूर येथील हे कुटुंब करळगाव येथे एका शेतात कामासाठी वास्तव्यास आले होते. रुपाली शेतालगत असलेल्या गिट्टी खदानीच्या डबक्यात कपडे धुण्यासाठी नेहमीप्रमाणे मुलगा भोला याच्यासोबत गेली. यावेळी मुलगा आंघोळीसाठी जातो असे म्हणून पाण्यात उतरला होता.

अंघोळासाठी पाण्यात उतरलेल्या मुलाला मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो डबक्यात बुडू लागला. मुलाला डबक्यात बुडताना पाहून रुपालीनेही पाण्यात उडी घेतली. मात्र तीही पाण्यात बुडाली, असा कयास बांधला जातो आहे.

कळलं कसं?

बराच वेळ झाला तरी पत्नी घरी आली नाही म्हणून पती शिवाजी शिंदे याने शोध घेण्यास सुरुवात केली. आजूबाजूला विचारपूस केली. त्यानंतर खदाणीच्या डबक्याजवळ आले असता पत्नी रुपालीचा मृतदेह डबक्यात शिवाजी याला दिसला. तिथेच मुलाताही मृतदेह दिसून आल्यानंतर पती हादरुन गेला होता. अखेर या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेऊन तपास सुरू केला आहे. मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून मायलेकाचा आकस्मित मृत्यू सगळ्यांच्याच मनाला चटका लावून गेलाय.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.