Uddhav Thackeray | हो! मुस्लिम मते मिळाली, कारण ती… उद्धव ठाकरे यांचा भाजपवर पलटवार
पुन्हा निवडणुका झाल्याच पाहिजे. पडलं तर आम्ही इंडिया आघाडीचं सरकार स्थापन करू. आम्ही कॉंग्रेस सोबत गेले याचा आरोप होतो. दुसरा आरोप शिवसेनेला मुस्लिम मते मिळाली. हो मिळाली शिवसेनेला मुस्लिम मते.

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला (ठाकरे गटाला) मुस्लीम मते मिळाली. कॉंग्रेससोबत जात ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले अशी टीका भाजपने केली होती. यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर कडक टीका झाली. त्यावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार पलटवार केला. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा 58 वा वर्धापन दिन सोहळा माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात संपन्न होत आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. आम्ही कोणत्याही परिस्थितीत मोदी यांच्यासोबत जाणार नाही. ज्यांनी मातेसमान शिवसेना संपविण्याचा प्रकार केला त्यांच्यासोबत कधीही जाणार नाही अशी घोषणा त्यांनी केली.
एनडीएसोबत जाण्याचा आता काही जण प्रचार करत आहेत. ज्याची फाटली आहे तेच असे बोलत आहेत. तुम्ही तुमचे बघाना. आमचं काय बघता. तुमची फाटली. माझी पंचाईत काय होते. घराणेशाही म्हटल्यावर घराची भाषा येते. तुम्ही माझ्यावर सभ्यतेचा शिक्का मारला. त्यामुळे समानार्थी शब्द शोधतो. फाटली या शब्दाला समानार्थी शब्द मिळत नाही. फाटले ते फाटले. भुजबळ शिवसेनेत येणार अशी पुडी सोडली. तुमच्याशी भुजबळ बोलले का. माझ्याशी बोलले का . मी त्यांच्याशी बोललो का मग कशाला उचापती करता असा थेट सवाल त्यांनी केला.
देशात पुन्हा मध्यावधी निवडणूक लागली तर आपले शिलेदार खासदार होईल. हे सरकार चालेल असे वाटत नाही. चालू नये असेच वाटतं. सरकार चालेल का पडेल का नाही. पडलेच पाहिजे. पुन्हा निवडणुका झाल्याच पाहिजे. पडलं तर आम्ही इंडिया आघाडीचं सरकार स्थापन करू. आम्ही कॉंग्रेस सोबत गेले याचा आरोप होतो. दुसरा आरोप शिवसेनेला मुस्लिम मते मिळाली. हो मिळाली शिवसेनेला मुस्लिम मते. ती देशभक्तांची मते मिळाली आहेत. आपण काँग्रेस सोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडल्याचा प्रचार केला गेला असा आरोप त्यांनी केला.
तिकडे डोमकावळे बसलेत. डोमकावळे म्हटल्यावर पिंडदान आलं. त्यांची कावकाव सुरू आहे. मी हिंदुत्व सोडलं नाही. देशभक्तांनी संविधान आणि देश वाचवण्यासाठी मला देशभक्तांनी मतदान केले आहे. मी हिंदुत्व सोडलं मुसलमानांच्या बाजूने लागलोय असं वाटत असेल तर मोदींनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडलं असा माझा दावा आहे, अशी टीकाही त्यांनी भाजपवर केली.
भाजपने हिंदुत्व सोडलं कसं? तुम्ही 2014 चा एनडीएचा फोटो पाहा. आताचा पाहा. यात कोण हिंदुत्ववादी आहेत? चंद्राबाबू काय हिंदुत्ववादी आहेत? चंद्राबाबू आणि नितीशकुमार यांनी जो जाहीरनामा दिला आहे. मोदींना आव्हान देतो, चंद्राबाबूंना दिलेले आश्वासन पूर्ण करू असं आंध्रात सांगा. चंद्राबाबू, नितीश कुमार यांनी काही मुसलमानांना आश्वासन दिले नाही? तुम्ही टोप्या घातल्या नाही. आमचं चोरून मारुन काहीच नाही. शिवसेना पाठून वार करेल असे मुसलमानांना वाटत नाही. तुम्ही ते करता. तुम्ही सत्तेचा वापर करतात अशी जोरदार टीका त्यांनी भाजपवर केली.
