AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर मी राजीनामा देईल, योगेश कदम यांचं अनिल परब यांना खुलं आव्हान

अनिल परब यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केले होते, परब यांच्या या आरोपांना आता कदम यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

...तर मी राजीनामा देईल, योगेश कदम यांचं अनिल परब यांना खुलं आव्हान
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 21, 2025 | 9:40 PM
Share

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्यावर काही गंभीर आरोप केले होते. योगेश कदम यांचे कार्यकर्ते वाळू चोरीमध्ये सहभागी आहेत, असं परब यांनी म्हटलं होतं. तसेच योगेश कदम यांच्या आईच्या नावाने मुंबईत सावली रेस्टॉरंट अँड बार आहे. या ठिकाणी पोलिसांनी छापा मारला. मुली ताब्यात घेतल्या. हा डान्सबार आहे, असा दावा देखील परब यांनी केला होता, त्यानंतर आज योगेश कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन परब यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

नेमकं काय म्हणाले कदम? 

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अर्धवट ज्ञान आणि अर्धवट वकील परब यांनी माझावर नियम मोडून आरोप केले. परबांनी आपल्या अकलेचे तारे तोडले,  त्यांनी वाळू चोरीचा आरोप केला.  अनिल परबांविरोधात मी हक्कभंग आणणार आहे, अनिल परबांविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहे. माझ्या आईचा काहीही संबंध नसताना आरोप करण्यात आले, कोणत्याही प्रकरणाशी माझा संबंध असला तरी मी राजीनामा देईल, चुकीचे आरोप करून आईला बदनाम करण्याचा प्रयत्न केला.  अनिल परबांना माफी मागावी लागेल, असा इशारा यावेळी योगेश कदम यांनी दिला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की,  मी वाळू विकली, वाळू विक्रेत्यांना माझा आश्रय आहे, असे आरोप परब यांनी केले.  मंडनगडच्या महादेव नाल येथे  पाणी साचत असल्याने, गाळ काढला पाहिजे ही मागणी केली. नियमानुसार त्याला परवानगी होती. तिथे   ५०० ब्रासची परवानगी होती, ही परवानगी मिळाल्यानंतर  न्यायालयाच्या नियमानुसार राँयल्टी भरली होती.  मे महिन्यात गाळाचा उपसा झाला, खेडमध्ये जगबुडी नदीचं पाणी शिरतं, तेथील गाळ काढला जावा अशी नागरिकांची मागणी होती, जगबुडी नदीत गाळ आहे. वाळू नाही. घरकुलाचा आणि जगबुडी नदीच्या वाळूचा काहीही संबध नाही. गाळ काढून नेण्याची जबाबदारी 24 शेतकऱ्यांना नियमानं दिली होती, हा गाळ विकला जात नाही कोणी तो घेत नाही, असं कदम यांनी म्हटलं आहे.

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.