AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“छोटी मोठी वादळं उठली म्हणून पर्वत…, शिंदेंच्या भेटीनंतर योगेश कदमांनी विरोधकांच्या विरोधात दंड थोपटले

सचिन घायवळ शस्त्र परवाना प्रकरणात योगेश कदम यांच्या अडचणी वाढल्या आहेत, विरोधकांकडून त्यांच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे, त्यानंतर आता त्यांनी एक पोस्ट शेअर करत विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

“छोटी मोठी वादळं उठली म्हणून पर्वत..., शिंदेंच्या भेटीनंतर योगेश कदमांनी विरोधकांच्या विरोधात दंड थोपटले
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 10, 2025 | 8:28 PM
Share

सचिन घायवळ याच्या शस्त्र परवाना प्रकरणात गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्या अडचणी वाढल्या आहेत, विरोधकांकडून त्यांच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे, विरोधकांची जोरदार टीका सुरू आहे. दरम्यान त्यानंतर आज योगेश कदम यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.  समोर आलेल्या माहितीनुसार आपली चूक नसेल तर घाबरायचं नाही, विरोधकांना जशास तसं उत्तर द्या, असं एकनाथ शिंदे यांनी योगेश कदम यांना म्हटलं आहे. त्यानंतर कदम यांनी ट्विटवर पोस्ट करत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.

नेमकं काय म्हणाले कदम? 

‘२०१९ पासून माझी राजकीय कारकीर्द संपुष्टात आणण्याचा प्रयत्न काहीजण करत आले. तरीसुद्धा सच्च्या शिवसैनिकांच्या जोरावर मी निवडून आलो. सत्तेतला आमदार म्हणून जनतेच्या अपेक्षा माझ्याकडून वाढल्या, परंतु तेव्हादेखील ज्या विरोधकाला आम्ही पराभूत केलं, त्यालाच ताकद देण्याचं काम काहीजणांनी केलं. स्वतःच्या पक्षातील आमदाराला संपवण्याचा प्रयत्न काहीजण तेव्हापासूनच करत होते. पुन्हा २०२४ च्या निवडणुकीत माझ्या कुटुंबियांचा स्वतःच्या वैयक्तिक राजकीय फायद्यासाठी वापर करून घेण्याइतपत राजकारणाची पातळी घसरली गेली.

मला पराभूत करण्यासाठी त्यांनी समाज, पैसा आणि जातीच्या आधारावर गलिच्छ राजकारण करण्याचे अनेक प्रकार केले. माझी वैयक्तिक बदनामी करण्याच्या हेतूने माझ्या खाजगी आयुष्यातदेखील ढवळाढवळ करण्याचा काहीजणांनी प्रयत्न केला. तरीदेखील, दुसऱ्यांदा जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून दिले. माझ्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखवत मला मंत्रीपद दिले. साहजिकच, ज्यांना मला आमदार म्हणून पाहण्याचीही इच्छा नव्हती, त्यांना मी मंत्री झालो हे कसं बघवणार! गेल्या सहा वर्षांपासून लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना आजवर माझ्यावर कोणीही गुंड किंवा भ्रष्ट प्रवृत्तीचे समर्थन केल्याचे आरोप देखील करू शकले नाहीत.

तरीसुद्धा काही ठराविक मंडळी माझी इमेज डॅमेज होण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहेत. दुसऱ्याची प्रतिमा मलिन करण्याच्या नादात, राजकारणात सक्रिय नसलेल्या माझ्या आईलादेखील या राजकारणात ओढून नीचपणाचा कळस गाठला गेला. व्यक्तीबद्दल मनात असलेला द्वेष काहीजणांना राजकारणात इतक्या खालच्या पातळीवर घेऊन येईल, अशी कल्पनादेखील केली नव्हती. असो, राजकारणात सर्वच गोष्टींचा ‘सामना’ करावा लागतोच. पण अशा राजकारणामुळे मी आजवर कधीच विचलित झालो नाही आणि पुढेही होणार नाही. मी माझं काम, माझी जबाबदारी आणि माझं कर्तव्य प्रामाणिकपणे निभावत आहे आणि पुढेही तसंच निभावत राहणार आहे. शेवटी असंच म्हणावं वाटतं की, “छोटी मोठी वादळं उठली म्हणून पर्वत हलतो असं नाही.” – योगेश कदम’ असं ट्विट कदम यांनी केलं आहे.

दरम्यान सचिन घायवळ शस्त्र परवाना प्रकरणावरून विरोधकांनी आता योगेश कदम यांच्यावर चांगलीच टीकेची झोड उठवली आहे, शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू आहे, त्याला आता कमद यांनी या पोस्टच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.