मोठी बातमी! वाल्मिक कराडचा व्हिडीओ पाहातो म्हणून तरुणाला बेदम मारहाण, कृष्णा आंधळेचं कनेक्शन समोर

बीडमधून मोठी बातमी समोर येत आहे, वाल्मिक कराड याचा व्हिडीओ का पाहातो? असा प्रश्न विचारत तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे.

मोठी बातमी! वाल्मिक कराडचा व्हिडीओ पाहातो म्हणून तरुणाला बेदम मारहाण, कृष्णा आंधळेचं कनेक्शन समोर
Follow us
| Updated on: Feb 05, 2025 | 11:27 PM

बीडमधून मोठी बातमी समोर येत आहे. वाल्मिक कराडचे व्हिडीओ का पाहातो? म्हणत तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अशोक मोहिते असं मारहाण करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. अशोक मोहिते या तरुणाला बीड जिल्ह्याच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकराणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्या मित्रांनी मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी सात आरोपींना अटक केलं आहे, मात्र कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

कृष्णा आंधळेचं स्टेटस 

आज  कृष्णा आंधळे याचा वाढदिवस आहे. आंधळेच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या मित्रांनी आपल्या व्हॉट्अॅपला कृष्णा आंधळेचा फोटो स्टेटस ठेवला होता. वैजनाथ बांगर, अभिषेक सानप नावाच्या  कृष्णा आंधळेच्या मित्रांनी स्टेटसला त्याचा फोटो ठेवला होता. याच दरम्यान वाल्मिक कराडचे व्हिडीओ पाहात असलेल्या अशोक मोहिते या तरुणाला मारहाण करण्यात आली आहे. वाल्मिक कराड याचे व्हिडीओ का पाहातो अशी विचारणा करत तरुणाला मारहाण करण्यात आली आहे.

कृष्णा आंधळे फरार 

काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली. वातावरण चांगलंच तापलं. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे, तसेच एसआयटी देखील स्थापण करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे हा अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये, तो फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. वाल्मिक कराड याच्यावर देखील मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान आज कृष्णा आंधळेच्या मित्रांनी तरुणाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. अशोक मोहिते  याला मारहाण करण्यात आली आहे.

'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?
'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?.
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी.
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला.
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', नितेश राणेंची टीका
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', नितेश राणेंची टीका.
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा.
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ.
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री.
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?.
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले...
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले....