AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budget 2022: अर्थमंत्र्याचा राजीनामा ते रात्रीचं बजेट; भारतात अर्थसंकल्पाची गोपनीयता संपणार?

अर्थ विभागातील अधिकाऱ्यांनी गोपनीयता बाळगण्याच्या सूचना असतात. इतकंच नव्हे बजेटच्या आठवडभर आधी सार्वजनिक वावरावर मोठ्या प्रमाणात निर्बंध असतात. अर्थसंकल्पाची प्रत मांडण्यापूर्वी मर्यादित अर्थतज्ज्ञ, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तसेच अर्थवर्तुळातील पत्रकार यांना सोपविली जाते. मात्र, अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी त्यामधील माहिती सार्वजनिक करता येत नाही. तसा अलिखित प्रघातच आहे.

Budget 2022: अर्थमंत्र्याचा राजीनामा ते रात्रीचं बजेट; भारतात अर्थसंकल्पाची गोपनीयता संपणार?
| Edited By: | Updated on: Jan 25, 2022 | 9:19 PM
Share

नवी दिल्ली : अर्थसंकल्प सादर करण्यासाठी अवघे सात दिवस शिल्लक आहेत. देशातील श्रमिक ते उद्योजक अशा सर्व घटकांच्या अर्थसंकल्पाकडे नजरा लागलेल्या असतात. अर्थसंकल्प प्रत्यक्ष पटलावर येईपर्यंत प्रचंड गोपनीयता बाळगण्यात येते. अर्थसंकल्प (Budget 2022) निर्मितीची विशिष्ट प्रक्रिया आहे. अर्थ मंत्रालयाची (Finance Minister) मुख्य इमारत नॉर्थ ब्लॉक (North Block) मध्ये अर्थसंकल्प निर्मितीवेळी इतरांना नो एन्ट्री असते. अर्थ विभागातील अधिकाऱ्यांनी गोपनीयता बाळगण्याच्या सूचना असतात. इतकंच नव्हे बजेटच्या आठवडभर आधी सार्वजनिक वावरावर मोठ्या प्रमाणात निर्बंध असतात. अर्थसंकल्पाची प्रत मांडण्यापूर्वी मर्यादित अर्थतज्ज्ञ, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तसेच अर्थवर्तुळातील पत्रकार यांना सोपविली जाते. मात्र, अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी त्यामधील माहिती सार्वजनिक करता येत नाही. तसा अलिखित प्रघातच आहे.

अर्थसंकल्प व गोपनीयतेला दीडशे वर्षाहून अधिक जुना इतिहास आहे. वर्ष 1850 मध्ये अर्थसंकल्पाच्या गोपनीयतेची बीज रोवली गेली. विल्यम ग्लॅडस्टोन वर्ष 1852 ते 55 पर्यंत अर्थविभागाचे प्रमुख होते. तेव्हापासून अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी त्यातील कोणताही भाग सार्वजनिक केला जात नाही.

..अन्, राजीनाम्याची कारवाई!

वर्ष 1947 मध्ये चॅन्सेलर ह्यूग डाल्टन यांना अर्थसंकल्प मांडण्यापूर्वीच अर्थसंकल्पातील तरतूदी सार्वजनिक केल्याने राजीनामा द्यावा लागला होता. अनौपचारिक चर्चेवेळी ह्यूग डाल्टन यांनी पत्रकारासमोर अर्थसंकल्पातील काही बाबींचा खुलासा केला होता. मात्र, पत्रकाराने गोपनीयतेच्या प्रघाताचा भंग करत वर्तमानपत्रातून अर्थसंकल्पातील काही गोष्टी सार्वजनिक केल्या होत्या.

छपाई गुप्तता ते अधिकारी क्वारंटाईन

स्वातंत्र्यानंतर वर्ष 1950 मध्ये अर्थसंकल्पातील काही भाग लीक करण्यात आला होता. त्यामुळे अर्थसंकल्पाची छपाई राष्ट्रपती भवन प्रेसमधून शासकीय प्रिंट, मिंटो रोड येथे हलविण्यात आली. वर्ष 1980 पासून अर्थसंकल्पाची छपाई नॉर्थ ब्लॉकच्या तळघरात केली जाते. अर्थसंकल्पपूर्व तयारीचे महत्वपूर्ण वैशिष्ट्य हलवा सोहळा. या कार्यक्रमानंतर संबंधित अधिकाऱ्यांना नॉर्थ ब्लॉकमध्ये क्वारंटाईन केले जाते. अर्थ मंत्रालयाच्या तळघरात केवळ अर्थसंकल्प छपाईचे काम करावे लागते.

ब्रिटनमध्ये सार्वजनिक पॅटर्न

अर्थविभागाचे प्रमुख पद निभावल्यानंतर गॉर्डन ब्राउन पंतप्रधान बनले. त्यावेळी अर्थसंकल्प गोपनीयता नष्ट केली. अर्थसंकल्प मांडण्यापूर्वीच पत्रकार परिषदेत संपूर्ण विवरण सांगितले जाते. त्यामुळे अर्थसंकल्प मांडण्यापूर्वीच माहिती पत्रकार परिषदेद्वारे लोकांपर्यंत सार्वजनिक केली जाते.

गोपनीयतेचा पडदा हटणार?

वर्ष 1999 पर्यंत भारतात फेब्रुवारीच्या अखेरच्या दिवशी सायंकाळा पाच वाजता अर्थसंकल्प सादर केल जातो. अर्थ मंत्री यशवंत सिन्हा यांनी सायंकाळी पाच ऐवजी सकाळी अकरा वाजता अर्थसंकल्प सादर करण्याची प्रथा सुरू केली. ब्रिटीशकालीन पद्धतीला मूठमाती देऊन अर्थसंकल्पाच्या गोपनीयतेवरचा पडदा दूर कधी सारणार याची अर्थजगताला प्रतीक्षा आहे.

इतर बातम्या :

Air India : प्रजासत्ताक दिनानंतर एअर इंडिया टाटाकडे सोपवली जाणार, 18 हजार कोटी रुपयांत मालकी

विद्युत शक्तीवर अर्थव्यवस्थेची भरारी ! वीज वापराची गती काय सांगते? इलेक्ट्रिक वाहनांची देशभरात लवकरच दावेदारी!

फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.