BEST STRIKE: महाराष्ट्र सरकारपेक्षा मुंबई महापालिका श्रीमंत : मुख्यमंत्री

BEST STRIKE: महाराष्ट्र सरकारपेक्षा मुंबई महापालिका श्रीमंत : मुख्यमंत्री

नवी दिल्ली: बेस्ट संपावर (BEST STRIKE) तोडगा काढण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. चर्चेतूनच मार्ग निघू शकतो, त्यामुळे आजच या संपावर तोडगा काढण्याचा प्रयत्न आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत काल आणि आजही माझी चर्चा झाली, याबाबत तोडगा काढण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत, असं फडणवीस यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री म्हणाले, “बेस्ट संपावर एक समिती स्थापन केली आहे. या समितीत मुख्य सचिव, परिवहन सचिव आणि महसूल सचिव तसंच अजय मेहता, बेस्ट एमडी आणि युनियनच्या सदस्यांचा समावेश आहे. या समितीची बैठक होईल. या बैठकीतून तोडगा निघू शकतो. त्या समितीच्या अहवालनंतरच योग्य निर्णय घेतला जाईल. बेस्टमधील ज्या काही अडचणी आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करणार आहे ”

राज्य सरकारने आर्थिक मदत करावी अशी मागणी शिवसेनेने केली आहे, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, “अशा पद्धतीची मागणी माझ्यापर्यंत पोहोचली नाही. अशी मागणी बीएमसीतून कोणी करेल असं मला वाटत नाही. कारण सर्वांनाच माहिती आहे की बीएमची महाराष्ट्र सरकारशी तुलना केली तर ती अधिक श्रीमंत आहे. पण प्रश्न तो नाही. पैसे देण्यापेक्षा सुधारणा आणि कामगारांचे  प्रश्न याचा ताळमेळ महत्त्वाच आहे”.

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य करण्याची तयारी बीएमसीची आहे. तर काही मागण्या अमान्य आहेत. मात्र हा प्रश्न चर्चेतूनच सुटू शकतो, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप

विविध मागण्यांसाठी मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आजचा चौथा दिवस आहे. तीन दिवस उलटूनही महापालिकेला यावर कुठलाही तोडगा काढता आलेला नाही. गुरुवारी महापौर बंगल्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत सलग सात तास चाललेल्या बैठकीत या संपावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तो निष्फळ ठरल्याने आज चौथ्या दिवशीही बेस्ट कर्मचारी संपावर आहेत.

संबंधित बातम्या 

BEST STRIKE : मोनो रेलचे कर्मचारी कामावर रुजू 

सलग सात तासांची बैठक निष्फळ, ‘बेस्ट’चा संपच सुरुच राहणार

संप मिटल्यावर बुके द्या, एकत्र राहा, राज यांचा बेस्ट कर्मचाऱ्यांना सल्ला

संपकरी बेस्ट कर्मचाऱ्यांना घरं खाली करण्याची नोटीस, मेस्माचीही कारवाई

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा दिवस, आजही मुंबईकरांचे हाल

‘बेस्ट’ संपामुळे बेहाल मुंबईकरांसाठी एसटीच्या 55 बस रस्त्यावर

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *