कोळीवाड्यानंतर आता वरळी पोलीस कॅम्पात कोरोनाचा शिरकाव

वरळी कोळीवाडा, आदर्शनगर नंतर आता कोरोना विषाणूने वरळी पोलीस कॅम्पमध्येही (Worli Police camp corona)  शिरकाव केला आहे.

कोळीवाड्यानंतर आता वरळी पोलीस कॅम्पात कोरोनाचा शिरकाव
Follow us
| Updated on: Apr 02, 2020 | 1:21 PM

मुंबई : वरळी कोळीवाडा, आदर्शनगर नंतर आता कोरोना विषाणूने वरळी पोलीस कॅम्पमध्येही (Worli Police camp corona)  शिरकाव केला आहे. पोलीस कॅम्पमधील एका इमारतीतील रहिवाशाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पोलीस आणि महापालिका आरोग्य अधिकारी इमारतीत दाखल झाले असून, त्यांनी इमारत सील केली आहे. (Worli Police camp corona)

दरम्यान, या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. हा व्यक्ती व्हीव्हीआयपी व्यक्तींकडे सुरक्षेसाठी तैनात असायचा. त्यांना कोरोनाची लागण झाल्याने धाकधूक वाढली आहे.

या रुग्णाला 20 मार्चपासून ताप येत होता. तर त्यांच्या पत्नीला काल रात्रीपासून ताप येत असल्याने पत्नीला कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे.

या दाम्पत्याने दोन मुले आहेत. या मुलांना सेव्हन हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात येणार आहे. तर मुलीला पोदार हॉस्पिटलमध्ये क्वारंन्टाईन करण्यात येणार आहे.

वरळी परिसरात कर्फ्यू

वरळी कोळीवाडा परिसरात 11 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने या परिसरात कर्फ्यू लावण्यात आला आहे. दरम्यान गेल्या 24 तासांत कोळीवाडा भागात नव्या रुग्णाची नोंद झालेली नाही, अशी माहिती स्थानिक शिवसेना नगरसेविका हेमांगी वरळीकर यांनी दिली.

याशिवाय इथल्या 108 रहिवाशांपैकी 86 रहिवाशांना पोदार हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

कोळीवाडा परिसरात दूध वितरण, स्वयंपाक गॅस सिलेंडर पुरवठाही  सुरु आहे.

जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी टप्याटप्याने काही दुकाने उघडण्याची शक्यता आहे. तसंच ठराविक वेळेत वस्तू खरेदी करता येतील. पण गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

पोदार हॉस्पिटलमध्ये कोरेनटाईन रहिवाशांच्या सोयी सुविधांबाबत स्थानिक शिवसेना आमदार-पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत.

वरळीतील परिस्थितीवर आदित्य ठाकरेंचं बारीक लक्ष आहे. मोबाईल फोन आणि सोशल मीडियावर शिवसेना पदाधिकारी आणि  लोकप्रतिनिधींकडून ते माहिती घेत आहेत.

संबंधित बातम्या 

वरळी कोळीवाड्यात 10 कोरोना पॉझिटिव्ह, काही रहिवाशांना पोदार हॉस्पिटलला हलवलं 

जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीत कोरोनाचा शिरकाव, लालबागमध्ये कोरोनाचा रुग्ण  

धारावीतील कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू, मुंबईत एकाच दिवसात कोरोनाचे 6 बळी

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.