AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिंचन घोटाळा : आता ईडीकडून अजित पवारांची चौकशी

विरेंद्रसिंह घुनावत, टीव्ही 9 मराठी, मुंबई : सिंचन घोटाळ्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांची अंमलबजावणी संचालनायाकडून (ईडी) चौकशी केली जाणार आहे. कालच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल करुन, सिंचन घोटाळ्यास तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार हेच जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. अजित पवार काय म्हणाले? “सिंचन […]

सिंचन घोटाळा : आता ईडीकडून अजित पवारांची चौकशी
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:57 PM
Share

विरेंद्रसिंह घुनावत, टीव्ही 9 मराठी, मुंबई : सिंचन घोटाळ्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांची अंमलबजावणी संचालनायाकडून (ईडी) चौकशी केली जाणार आहे. कालच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल करुन, सिंचन घोटाळ्यास तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार हेच जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.

अजित पवार काय म्हणाले?

“सिंचन घोटाळ्याच्या आरोपाचं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. प्रकरण नागपूर खंडपीठात असून, अधिक वक्तव्य करणार नाही. माझ्या वक्तव्यामुळे न्यायप्रविष्ट प्रकरणात कुठलीही बाधा येता कामा नये. जनहित डोळ्यांसमोर ठेवून कामे केलेली आहेत. नियमांनी कामं केलेत. कुठेही नियम डावळले नाहीत.” – अजित पवार

सिंचन घोटाळा झालाच नाही, अभियंत्यांचा दावा

एकीकडे सिंचन घोटाळ्याला तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार हेच जबाबदार असल्याचं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे, तर दुसरीकडे, राज्यात सिंचन घोटाळा झालाच नसल्याचा दावा इंजिनिअर्स वेलफेअर असोसिएशनने केला आहे. या असोसिएशनने नागपूर खंडपीठात यासंदर्भात याचिका दाखल केली आहे.

इंजिनिअर्स वेलफेअर असोसिएशनने याचिकेत काय म्हटलंय?

राज्यात 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा झाल्याचा आरोप तथ्यहीन असून, अशा प्रकारची कुठलीही आर्थिक अनियमितता झालेलीच नसल्याचा दावा करणारा मध्यस्थी अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल झाला आहे. विदर्भातील विविध सिंचन प्रकल्पांच्या कामात आर्थिक  गैरव्यवहार झाल्याचा आरोप करणारी याचिका न्यायालयात दाखल आहे. याच याचिकांमध्ये हा मध्यस्थी अर्ज दाखल करण्यात आला आहे.

सिंचन घोटाळ्याला अजित पवारच जबाबदार : एसीबी

माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासाठी धक्कादायक बातमी आहे. सिंचन घोटाळ्यास तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार हेच जबाबदार असल्याचं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. एसीबीचे महासंचालक संजय बर्वे यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात हे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलं.

काय आहे सिंचन घोटाळा?

विदर्भातील 38 सिंचन प्रकल्पाची किंमत 6672 कोटी रूपयांवरून थेट 26722 कोटी रूपयांवर पोहोचली. ठेकेदारांच्या दबावाखाली ही दरवाढ करण्यात आल्याचा आरोप आहे. ही वाढ मूळ प्रकल्पाच्या 300 पट आहे, किंमतवाढीच्या जास्तीच्या 20 हजार कोटी रूपयांच्या वाढीव खर्चाला फक्त तीन महिन्यांमध्ये परवानगी मिळाली. जून, जुलै आणि ऑगस्ट 2009 मध्ये वाढीव खर्चाला कोणत्याही हरकतीशिवाय परवानगी देण्यात आली.

व्हीआयडीसी म्हणजे विदर्भ सिंचन विकास महामंडळाने ही भाववाढ मंजूर करून घेण्यासाठी बांधकाम साहित्यातील भाववाढ, मजुरांवरील खर्च आणि इंजिनीयरिंग कामाचा खर्च आणि भूसंपादनात झालेली वाढ ही कारणे दिली. मात्र वाढीव खर्च मंजूर करवून घेण्यासाठी जी तत्परता दाखवण्यात आली, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या, असाही आरोप करण्यात आला. यात धक्कादायक म्हणजे निम्न वर्धा प्रकल्पाला प्रशासकीय मंजूरी चक्क 15 ऑगस्ट म्हणजेच राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशी मिळाली.

या प्रकल्पाची किंमतही 950 कोटी रूपयांवरून 2356 कोटी रूपयांवर वाढवली गेली. अमरावतीमधील अप्पर वर्धा प्रकल्पाची किंमतही 661 कोटींवरून 1376 कोटी रूपयांवर पोहोचली. यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा नदीवरील प्रकल्पाची किंमत 1278 कोटी रूपयांवरून 2176 कोटी रूपयांवर पोहोचली. या वाढीव खर्चाला 14 ऑगस्ट 2009 मध्ये परवानगी मिळाली. अप्पर वर्धा आणि बेंबळा नदीवरील प्रकल्प एकाच दिवसात म्हणजे 14 ऑगस्टला मंजूर झाले.

विदर्भ सिंचन विकास महामंडळाने 24 जून 2009 या एकाच दिवशी तब्बल दहा प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मंजुरी दिली. या दहा प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय परवानगी मिळाल्यानंतर व्हीआयडीसीने एकाच दिवसात लगेच सर्व 38 प्रकल्पांसाठी निविदाही जारी केल्या.

तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी या सर्व मोठ्या आणि लघु प्रकल्पांना आणि त्यांच्या वाढीव खर्चाला ज्या घाईघाईने मंजुरी दिली, त्यामुळे संशयाचं वातावरण निर्माण झालं.

जलसंपदा मंत्री असताना अजित पवारांनी सर्व नियमांना फाटा देत फक्त नऊ महिन्यात तब्बल 20 हजार कोटी रूपयांच्या वाढीव खर्चाच्या प्रकल्पांना मंजुरी दिली. महिन्यांच्या हिशेबानुसार, जुलै ते ऑगस्ट या तीन महिन्यातच 32 प्रकल्पांना मंजुरी मिळाली. हे प्रकल्प मंजूर करण्यासाठी व्हीआयडीसीच्या सुकाणू समितीचीही संमती घेण्यात आली नसल्याचा आरोप आहे.

Follow Us
पंतप्रधानांच्या नेदरलँड दौऱ्यात 17 करारांवर स्वाक्षऱ्या, सामान्यांना..
पंतप्रधानांच्या नेदरलँड दौऱ्यात 17 करारांवर स्वाक्षऱ्या, सामान्यांना...
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानला अ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानला अ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा.
मोदींना लिहिलेल्या पत्रावरून खोत- पडळकरांचा पवारांना खोचक टोला
मोदींना लिहिलेल्या पत्रावरून खोत- पडळकरांचा पवारांना खोचक टोला.
मोठी बातमी! डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक निच्चांकीवर, धक्कादायक आकडे
मोठी बातमी! डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक निच्चांकीवर, धक्कादायक आकडे.
पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड, नंतर 15...असह्य वेदनेने महिला ओरडत राहिली,
पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड, नंतर 15...असह्य वेदनेने महिला ओरडत राहिली,.
मोठी बातमी! दोन दिवस कसून चौकशी, रात्रभर प्रश्नांचा मारा...अखेर
मोठी बातमी! दोन दिवस कसून चौकशी, रात्रभर प्रश्नांचा मारा...अखेर.
मुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्यावर संजय राऊतांचं हटके उत्तर चर्चेत...
मुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्यावर संजय राऊतांचं हटके उत्तर चर्चेत....
पेपरफुटीपासून आत्महत्यांपर्यंत….भाजपच जबाबदार, राऊतांचे गंभीर आरोप
पेपरफुटीपासून आत्महत्यांपर्यंत….भाजपच जबाबदार, राऊतांचे गंभीर आरोप.
गटातटांनी राष्ट्रवादीला पोखरलं... थेट सुनेत्रा पवार मैदानात उतरणार...
गटातटांनी राष्ट्रवादीला पोखरलं... थेट सुनेत्रा पवार मैदानात उतरणार....
ठो ठो आवाज आला... एकदा नव्हे दोनदा... नागपूरमधल्या गजबजलेल्या भागात...
ठो ठो आवाज आला... एकदा नव्हे दोनदा... नागपूरमधल्या गजबजलेल्या भागात....