संभाजीराजे मंत्र्यांपेक्षा मोठे नाहीत, समर्थकांच्या गोंधळाचा निषेध : गुणरत्न सदावर्ते

सारथीच्या मुद्द्यावर आयोजित बैठकीतील गोंधळावर अ‍ॅड. गुणवंत सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली (Gunratna Sadavarte on chaos in Sarthi meeting Sambhajiraje).

संभाजीराजे मंत्र्यांपेक्षा मोठे नाहीत, समर्थकांच्या गोंधळाचा निषेध : गुणरत्न सदावर्ते

मुंबई : सारथीच्या मुद्द्यावर आयोजित बैठकीत गोंधळ झाल्यानंतर राज्यभरात याचे पडसाद उमटले. या गोंधळावरुन मराठा आरक्षणाला आव्हान देणारी याचिका करणारे अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी देखील प्रतिक्रिया दिली (Gunratna Sadavarte on chaos in Sarthi meeting Sambhajiraje). त्यांनी खासदार संभाजीराजे यांच्या समर्थकांचा निषेध केला. तसेच खासदार संभाजीराजे हे कॅबिनेट मंत्र्यांपेक्षा मोठे नसल्याचं मत व्यक्त केलं. यावेळी त्यांनी सारथी संस्थेच्या निर्मितीवरुनही अनेक प्रश्न उपस्थित केले.

गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “खासदार संभाजीराजे मराठा युवकांचे पुढारी असू शकतात. परंतू ते राज्यपाल, मंत्री यांच्यापेक्षा श्रेष्ठ नाहीत. संभाजीराजेंनी आपल्या समर्थकांना त्यांची मर्यादा समजावून सांगितली पाहिजे होती. मात्र, तसं झालेलं दिसलं नाही. मुळात सारथी सारख्या जातीय व्यवस्थेतून 1000 धनदांडग्यांसाठी पैशाचा असा अपव्यय करणं योग्य नाही. यांना गरज नाही, त्यामुळे त्यावर पैसे खर्च करु नये.”

“या घटनेनंतर गोंधळ करणाऱ्यांसाठी ही संस्था निर्माण केली आहे का? त्यासाठी खासदार संभाजीराजे यांच्या सारख्या लोकांचं पुढारपण आहे का? हे सर्व निंदाजनक आहे,” असंही गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

दरम्यान, मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत सुरु असलेल्या बैठकीत गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाला होता. छत्रपती संभाजीराजे यांना व्यासपीठाखाली बसवल्यामुळे मराठा समाज समन्वयकांनी गोंधळ घातला. (Saarthi Meeting Maratha Protesters Ruckus as Chhatrapati Sambhajiraje sits in third row)

जाणून बुजून छत्रपतींचा अपमान केल्याचा आरोप मराठा समाज समन्वयकांनी केला. संभाजीराजे यांनी मात्र “मी समाजासाठी आलोय. मला खाली बसण्यात कसलाही अपमान वाटत नाही” अशी सामंजस्याची भूमिका घेतली. त्यानंतर अजित पवारांनी चूक सुधारत राजेंना वरती येण्याचा आग्रह केला.

संभाजी राजे यांनी आपण सामान्य जनतेचा प्रतिनिधी असल्याचे सांगत तिसऱ्या रांगेत बसण्याची तयारी दर्शवली. “गोंधळ घालू नका. आपल्याला समाज महत्वाचा आहे. समाजासाठी आपण मान अपमान न मानता बैठक करू. निर्णय महत्वाचा आहे. सारथी महत्वाची आहे.” असे आवाहन त्यांनी मराठा समाज समन्वयकांना केले.

मराठा समाज समन्वयक काय म्हणाले?

जाणून बुजून छत्रपतींचा अपमान केल्याचा आरोप मराठा समाज समन्वयकांनी केला. “मी बाहेर जाऊ का?” असे संभाजीराजेंनी विचारताच “असं नाही, तुमची इच्छा, त्यापेक्षा आम्ही जातो न बाहेर, उद्या आम्हाला पण विचारतील ना. छत्रपतींबरोबर गेला होतात, खाली बसवायला गेला होतात का? बाहेर काय तोंड द्यायचं आम्ही? बाहेर आम्हाला लोक काय बोलणार? बाहेर एक माणूस तोंड काढू देणार नाही छत्रपती बाहेर बसले तर” असे मराठा समाज समन्वयक म्हणाले.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर! 

या बैठकीला उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार आधी बैठकीबाहेर गेले. त्यानंतर “मला अजित पवार यांनी विनंती केली, कीआत बोलू” अशी प्रतिक्रिया देत छत्रपती संभाजीराजेही बैठकीतून बाहेर पडले. दोघांमध्ये पुन्हा दुसऱ्या दालनात स्वतंत्र चर्चा झाली.

संबंधित बातम्या :

अजित पवारांचा छत्रपती संभाजीराजेंना फोन, ‘सारथी’ प्रश्नी बैठकीला येण्याची विनंती

Maratha Reservation | व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे निकाल शक्य नाही, मराठा आरक्षणावरील सुनावणीत सुप्रीम कोर्टाचे मत

मी ओबीसी म्हणून आरोपीच्या पिंजऱ्यात, मराठा मोर्चाच्या राजीनाम्याच्या मागणीवर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

Gunvant Sadavarte on chaos in Sarthi meeting Sambhajiraje

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *