मनसे नेते संदीप देशपांडे यांना जामीन नाकारला, 14 नोव्हेंबरपर्यंत कोठडी

न्यायालयाने संदीप देशपांडे यांना जामीन नाकारला असून 14 तारखेपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश महानगर न्यायदंडाधिकारी पी एस काळे  यांनी दिले आहेत.  

मनसे नेते संदीप देशपांडे यांना जामीन नाकारला, 14 नोव्हेंबरपर्यंत कोठडी

मुंबई :मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande in custody) यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम 353 नुसार शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने संदीप देशपांडे (Sandeep Deshpande in custody) यांना जामीन नाकारला असून 14 तारखेपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश महानगर न्यायदंडाधिकारी पी एस काळे  यांनी दिले आहेत.  सरकारी कामात अडथळा आणल्याची महापालिका सहायक आयुक्त किरण दिघावकर यांची शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार संदीप देशपांडे यांना कोर्टात हजर करण्यात आलं असता, कोर्टाने त्यांना 14 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

दादर-माहिम परिसरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिवाळी निमित्त लावलेल्या कंदिलांवर महापालिकेने कारवाई केली होती (BMC action on MNS sky lamp). महापालिकेने हे कंदिल काढून कचऱ्यात टाकले, त्यावरुन मनसे सरचिटणीस आणि माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी महापालिका सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांना फैलावर घेतलं होतं(Sandeep Deshpande vs BMC officer). यावेळी त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळही केल्याचा आरोप आहे. त्याप्रकरणी पालिका अधिकाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं. संदीप देशपांडे यांना शिवाजी पार्क पोलिसांनी दुपारी ताब्यात घेतलं. (Sandeep Deshpande Arrest). सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप संदीप देशपांडे यांच्यावर आहे.

नेमकं प्रकरण काय?

दादर-माहिम परिसरात मनसेने दिवाळी निमित्त शुभेच्छा देणारे कंदिल लावलेले होते. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फोटोही होता. मनसे दरवर्षी हे कंदिल लावतात आणि तुळशीच्या लग्नानंतर ते काढलेही जातात. मात्र, यावेळी महापालिकेने हे कंदिल अनधिकृत असल्याचं सांगत कारवाई केली. ते सर्व कंदिल काढले. यावेळी मनसेचे कंदिल हटवण्याची कारवाई करताना महापालिकेला शिवसेनेने विभागात लावलेले कंदिल आणि झेंडे दिसले नाहीत का, असा खडा सवाल संदीप देशपांडे यांनी केला.तसेच, मनसेला टार्गेट केल्या जात असल्याचंही ते म्हणाले. हे पक्षीय राजकारण आम्ही सहन करणार नाही, असा मनसे स्टाईल इशाराही त्यांनी दिला. मनसेच्या कंदिलांवर महापालिकेच्या कारवाईनंतर दादर-माहिम मधलं राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळालं.

दादर-माहिम परिसराती व्यावसायिक उपहार गृह आणि रेस्टॉरंटने केलेली अनधिकृत बांधकामं, महापालिकेला दिसत नाहीत, ज्यामध्ये पडून लोकांचा जीव जातो ते रस्त्यावर पडलेले खड्डे दिसत नाहीत, असंही संदीप देशपांडे यांनी सहाय्यक आयुक्त दिघावकर यांना विचारलं. यावेळी आयुक्त यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं. संदीप देशपांडे यांनी आयुक्तांसोबतच्या अधिकाऱ्यालाही खडसावलं.

संदीप देशपांडे विरोधात पोलिसांत तक्रार

या घटनेनंतर संदीप देशपांडे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. सरकारी कामात अडथळा आणि अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी संदीप देशपांडे यांच्या विरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर शिवाजी पार्क पोलिसांनी कारवाई करत संदीप देशपांडे यांना ताब्यात घेतलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *