मुंबई भाजप कार्यालयात झेंडे लावून कार्यकर्ते पसार

मुंबई: पाच राज्यांच्या निकालाचं चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या भाजपशासित राज्यात काँग्रेसने मुसंडी मारली आहे. तीनही राज्यात भाजपला सत्ता टिकवणं अवघड झाल्याचं चित्र आहे. त्याचा परिणाम देशभरातील भाजप कार्यालयात दिसत आहे. एरव्ही कोणत्याही राज्याचा निकाल लागल्यानंतर जल्लोष करणारं मुंबई भाजप कार्यालय आज शांत आहे. मुंबई भाजप कार्यालयात शुकशुकाट आहे. …

मुंबई भाजप कार्यालयात झेंडे लावून कार्यकर्ते पसार

मुंबई: पाच राज्यांच्या निकालाचं चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या भाजपशासित राज्यात काँग्रेसने मुसंडी मारली आहे. तीनही राज्यात भाजपला सत्ता टिकवणं अवघड झाल्याचं चित्र आहे. त्याचा परिणाम देशभरातील भाजप कार्यालयात दिसत आहे. एरव्ही कोणत्याही राज्याचा निकाल लागल्यानंतर जल्लोष करणारं मुंबई भाजप कार्यालय आज शांत आहे. मुंबई भाजप कार्यालयात शुकशुकाट आहे. ऑफिसबाहेर झेंडे आणि टेबल लावले आहेत, पण तिथे कोणीच नाही. कार्यालयात एकही कार्यकर्ता किंवा पदाधिकारी उपस्थित नाही. वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला आहे मात्र त्यात आत्मविश्वास नाही. हे चित्र सध्या मुंबई भाजप कार्यालयात पाहायला मिळत आहे.

यापूर्वी ज्या ज्या राज्यात भाजपचं सरकार आलं, त्या त्या वेळी मुंबई भाजप कार्यालयात फटाके फोडून, गुलाल उधळून सेलिब्रेशन करण्यात आलं होतं. मात्र आता विजय न मिळाल्याने भाजप कार्यालय ओस पडलं आहे.

दुसरीकडे देशभरातील भाजप कार्यालयांमध्येही शुकशुकाट आहे. राजस्थानातील जयपूरमध्ये तर निवडणूक असूनही भाजप कार्यलय थंडावलेलं आहे. तीच परिस्थिती छत्तीसगड, मध्यप्रदेशात आहे.

भाजपला विश्वास

दरम्यान, दिवस जसजसा वर चढेल तसतसा भाजपचा सूर्य चमकेल. काँग्रेसला थोडा आनंद साजरा करु द्या, 2014 पासून ते हरत आहेत, असं भाजपचे प्रवक्ते प्रेम शुक्ला म्हणाले.

मध्यप्रदेश – 

भोपाळ प्रदेश काँग्रेसच्या ऑफिसमध्ये कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली आहे, तर दुसरीकडे प्रदेश भाजप कार्यालयात कमालीची शांतता आहे.

छत्तीसगड, रायपूर –

भाजपकडून घोडेबाजाराची शक्यता आहे, त्यामुळे काँग्रेसच्या सर्व विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र घेऊन थेट काँग्रेस कार्यालयात येण्याचे आदेश दिले आहेत. कर्नाटकचं नाटक आम्ही बघितलं, असं रायपूर ग्रामीणचे काँग्रेस उमेदवार सत्यनारायण शर्मा म्हणाले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *