वरळी कोळीवाड्यात कोळी समाजाच्या नेत्याचा 'कोरोना'मुळे मृत्यू, धारावीत डॉक्टरलाच 'कोरोना'

वरळीतील कोळीवाड्याच्या नेत्याचं 'कोरोना'वरील उपचारादरम्यान निधन झालं. त्यांची पत्नी आणि मुलगाही 'कोरोना'ची लागण झाली आहे (Mumbai Worli Koliwada Death by Corona)

वरळी कोळीवाड्यात कोळी समाजाच्या नेत्याचा 'कोरोना'मुळे मृत्यू, धारावीत डॉक्टरलाच 'कोरोना'

मुंबई : मुंबईच्या वरळी  कोळीवाड्यातील कोळी समाजाच्या नेत्याचा ‘कोरोना’मुळे बळी गेला आहे. तर धारावीत एका डॉक्टरचीच ‘कोरोना’ चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या काही दिवसात मुंबईतील ‘कोरोना’ग्रस्त रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. (Mumbai Worli Koliwada Death by Corona)

वरळीतील कोळीवाड्याच्या नेत्याचं ‘कोरोना’वरील उपचारादरम्यान निधन झालं. त्यांची पत्नी आणि मुलगाही ‘कोरोना’ची लागण झाल्यामुळे कस्तुरबा रुग्णालयात दाखल आहेत. या वृत्तामुळे वरळी कोळीवाड्यातील रहिवाशांच्या चिंतेत भर पडली आहे.

वरळी कोळीवाडा परिसरात 11 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने या परिसरात कर्फ्यू लावण्यात आला आहे. 108 रहिवाशांपैकी 86 रहिवाशांना पोदार हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं आहे. कोळीवाडा परिसरात दूध वितरण, स्वयंपाक गॅस सिलेंडर पुरवठाही  सुरु आहे.

धारावीत डॉक्टरलाच ‘कोरोना’

दुसरीकडे, मुंबईच्या धारावीत कोरोनाचा तिसरा रुग्ण मिळाला. 35 वर्षीय डॉक्टरलाच ‘कोरोना’ची लागण झाली आहे. कोरोनाबाधित रुग्णापासून डॉक्टरला संसर्ग झाल्याचा अंदाज आहे.

हेही वाचा : धारावीतील कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू, मुंबईत एकाच दिवसात कोरोनाचे 6 बळी

डॉक्टरच्या कुटुंबालाही क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. तो राहत असलेली इमारतही मुंबई महापालिकेने सील केली आहे. त्याच्या संपर्कातील व्यक्तींचाही शोध सुरु आहे. (Mumbai Worli Koliwada Death by Corona)

वरळी कोळीवाडा, आदर्शनगरनंतर कोरोना विषाणूने वरळी पोलीस कॅम्पमध्येही शिरकाव केला आहे. पोलीस कॅम्पमधील एका इमारतीतील रहिवाशाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पोलीस आणि महापालिका आरोग्य अधिकारी इमारतीत दाखल झाले असून, त्यांनी इमारत सील केली आहे

मुंबईतील 147 ठिकाणं सील

बृहन्मुंबई महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील 147 ठिकाणे सील करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच होम क्वारंटाईमधील नागरिकांची राहण्याची व्यवस्था करण्यासाठी खासगी इमारती आणि जहाजे ताब्यात घेण्याचे आदेश महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी दिले आहेत.

हेही वाचा : जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीत कोरोनाचा शिरकाव, लालबागमध्ये कोरोनाचा रुग्ण

राज्यात काल दिवसभरात 88 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात सर्वाधिक 54 रुग्ण हे मुंबईतील आहेत. मुंबईतील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 235 झाली आहे.

राज्यात आतापर्यंत 24 जणांचे कोरोनामुळे बळी गेले आहेत. यातील सर्वाधिक मृत्यू हे मुंबईतील आहेत. मुंबईत काल दिवसभरात 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधित मृतांची संख्या 18 वर पोहोचली आहे.

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई114284870746353
पुणे (शहर+ग्रामीण)89231373112099
ठाणे (शहर+ग्रामीण)93342588362585
पालघर 156199323327
रायगड1653810858373
रत्नागिरी170092662
सिंधुदुर्ग3682717
सातारा38722169138
सांगली234594063
नाशिक (शहर +ग्रामीण)147508931462
अहमदनगर (शहर+ग्रामीण)4740276061
धुळे30611943101
जळगाव 108267385518
नंदूरबार 62941431
सोलापूर91294615504
कोल्हापूर 50601590105
औरंगाबाद138968250482
जालना1940143474
हिंगोली 55042512
परभणी64333324
लातूर 2067102089
उस्मानाबाद 97151845
बीड75726920
नांदेड 169574675
अकोला 25931951115
अमरावती 2034137060
यवतमाळ 94350827
बुलडाणा 128368539
वाशिम 59136112
नागपूर4835193073
वर्धा 1961024
भंडारा2451942
गोंदिया 2882303
चंद्रपूर4302610
गडचिरोली2692251
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)398048
एकूण42211825612814994

(Mumbai Worli Koliwada Death by Corona)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *