नालासोपारा स्टेशनवर प्रवाशांचा उद्रेक, रेल्वे रुळांवर उतरत लोकल अडवली

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्य आणि खाजगी नोकऱ्या करणाऱ्या प्रवाशांनाही लोकलची व्यवस्था करावी, अशी मागणी केली जात आहे.

नालासोपारा स्टेशनवर प्रवाशांचा उद्रेक, रेल्वे रुळांवर उतरत लोकल अडवली

नालासोपारा : पश्चिम रेल्वेवरील नालासोपारा रेल्वे स्थानकावर बुधवारी सकाळी प्रवाशांचा उद्रेक पाहायला मिळाला. लोकलने प्रवास करण्यास परवानगी देण्याची मागणी करत अनेक प्रवासी रेल्वे रुळांवर उतरले. संतप्त प्रवाशांनी सकाळी 8.30 वाजता लोकल अडवून धरल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. (Nalasopara Residents Ruckus at Railway Station)

वसई-विरार, नालासोपारा या भागात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसात रुग्णसंख्येने दहा हजाराचा टप्पा ओलांडला आहे. नालासोपारा परिसरात मोठ्या प्रमाणावर मध्यमवर्गीय नागरिक राहतात. खाजगी कार्यालयामध्ये 15 टक्के कर्मचाऱ्यांन नोकरीवर बोलावण्याची मुभा आहे. मात्र मुंबईत नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वाहतूक व्यवस्थेची कार्यालयाकडून कोणतीही सोय झालेली नाही.
बेस्टच्या अपुऱ्या बसेस, केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल वाहतूक आणि नोकरीच्या ठिकाणी कामावर येण्यासाठी होणारा दबाव यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.

नालासोपारा परिसरात राहणाऱ्या नागरिकांचा उद्रेक झाला. लोकलने प्रवास करण्यास परवानगी देण्याची मागणी करत रेल्वे स्थानकावर जमलेले अनेक प्रवासी रेल्वे रुळांवर उतरले. संतप्त प्रवाशांनी 8.30 वाजताच्या सुमारास लोकल अडवून धरली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परीस्थिती काही वेळातच नियंत्रणात आली.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्य आणि खाजगी नोकऱ्या करणाऱ्या प्रवाशांनाही लोकलची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रवासी संघटनेच्या लता अरगडे यांनी केली आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेकांचा रोजगार बुडाला आहे, नोकरीवर गदा आल्याने आर्थिक संकट आलेले आहे. लोकांच्या मनात कोरोनाची धास्ती आहे. अशात बेस्ट बसमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडतो. कर्मचाऱ्यांच्या वाहतूक व्यवस्थेची सोय करण्याची जबाबदारी शासनाची आहे, असे प्रवासी संघटनेचे म्हणणे आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

दरम्यान, प्रवाशांची व्यवस्था करण्याची जबाबदारी सरकारची आहे, सरकार घरी बसून आहे, बाहेर पडून लोकांची मागणी ऐका, अशी मागणी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली.

पहा व्हिडिओ :

(Nalasopara Residents Ruckus at Railway Station)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *