राष्ट्रवादीचा दुसरा उमेदवार, संजय दिना पाटलांना उमेदवारी

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसने अध्यक्ष शरद पवार यांच्यानंतर आपला दुसरा उमेदवार जवळपास निश्चित केला आहे. राष्ट्रवादीने संजय दिना पाटील यांना ईशान्य मुंबईतील उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या भाजपचे किरीट सोमय्या या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळे ईशान्य मुंबईत यंदा संजय दिना पाटील विरुद्ध किरीट सोमय्या यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे.यापूर्वी गेल्या निवडणुकीतही या दोघांमध्येच लढत झाली …

राष्ट्रवादीचा दुसरा उमेदवार, संजय दिना पाटलांना उमेदवारी

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसने अध्यक्ष शरद पवार यांच्यानंतर आपला दुसरा उमेदवार जवळपास निश्चित केला आहे. राष्ट्रवादीने संजय दिना पाटील यांना ईशान्य मुंबईतील उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या भाजपचे किरीट सोमय्या या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळे ईशान्य मुंबईत यंदा संजय दिना पाटील विरुद्ध किरीट सोमय्या यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे.यापूर्वी गेल्या निवडणुकीतही या दोघांमध्येच लढत झाली होती, त्यावेळी सोमय्यांनी बाजी मारली होती.

मोदींच्या पावलावर पवारांचं पाऊल
दरम्यान, ईशान्य मुंबईतील जागा राष्ट्रवादी लढवणार असून, ईशान्य मुंबईतील बूथ अध्यक्षांबरोबर शरद पवार संवाद साधणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे शरद पवार व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून हा संवाद साधणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर शरद पवारही पाऊल टाकत आहेत.

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचं चित्र

ईशान्य मुंबईमध्ये सलग दोनवेळा कोणीही निवडून आलं नसून प्रमोद महाजनांसारख्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. ईशान्य मुंबईचा भाग मिश्र मतदारांचा असून मराठी, गुजराती, दलित, उत्तर भारतीयांसारखे सर्व मतदार यात आहेत. हे समीकरण ज्या पक्षाला जास्त चांगलं जमवता येईल त्याचा विजय निश्चित आहे. गेल्यावेळी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी आपकडून ही निवडणूक लढवली होती पण मोदी लाटेसमोर त्यांचा टिकाव लागला नाही. पण आता समीकरणं बदलली असून भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी कायम शिवसेना नेतृत्वाला टीकेचं लक्ष केल्याने निवडणुकीच्या माध्यमातून ती खदखद बाहेर येण्याची शक्यता आहे.

मुलुंडपासून मानखुर्दपर्यंत हा मतदारसंघ पसरलेला असून 2009 च्या निवडणुकीत सोमय्या यांचा फक्त 2 हजार 399 मतांनी पराभव झाला होता. पण 2014 च्या निवडणुकीत त्यांनी तब्बल 5 लाख 25 हजार 285 मते मिळवून राष्ट्रवादीचे  संजय पाटील यांच्यावर मात केली. ईशान्य मुंबईतल्या एकूण सहा आमदारांपैकी तीन आमदार भाजपचे आहेत, तर शिवसेनेचे दोन आणि समाजवादी पक्षाचा एक आमदार आहे.

संबंधित बातम्या

ईशान्य मुंबई लोकसभा : किरीट सोमय्यांना यंदा शिवसेनेचंच आव्हान

शिवसैनिकांचा निर्धार, किरीट सोमय्यांना पाडणारच! 

महाआघाडीकडून मनसेचे महेश मांजरेकर विरुद्ध किरीट सोमय्यांची लढत?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *