वसईतील प्रसिद्ध डॉक्टरचा ‘कोरोना’ने मृत्यू, बविआचे माजी नगरसेवक डॉ. हेमंत पाटील कालवश

डॉ. हेमंत पाटील हे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांचे कट्टर समर्थक होते. खुद्द हितेंद्र ठाकूर यांनी हेमंत पाटील यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले

वसईतील प्रसिद्ध डॉक्टरचा 'कोरोना'ने मृत्यू, बविआचे माजी नगरसेवक डॉ. हेमंत पाटील कालवश
Follow us
| Updated on: Jul 12, 2020 | 11:51 AM

वसई : वसईतील प्रसिद्ध डॉक्टर आणि माजी नगरसेवक हेमंत पाटील यांचे कोरोनाने निधन झाले. कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीपासूनच डॉ. हेमंत पाटील हे कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी कार्यरत होते. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांचे ते कट्टर समर्थक होते. (Vasai Doctor Hemant Patil Dies of Corona)

नालासोपाऱ्यातील रिद्धीविनायक हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या 10 दिवसापासून ते अत्यवस्थ होते, अशी माहिती महापौर प्रवीण शेट्टी यांनी दिली आहे.

डॉ. हेमंत पाटील हे वसईतील प्रसिद्ध डॉक्टर होते. मागच्या 10 वर्षांपासून वसई विरार महापालिकेची आणि त्यापूर्वी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाची सर्वस्वी जबाबदारी ते स्वतःहून सांभाळत होते. हेमंत पाटील यांनी नगरसेवक आणि सभापतीपदही सांभाळलेले आहे.

बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांचे ते कट्टर समर्थक होते. खुद्द हितेंद्र ठाकूर यांनी हेमंत पाटील यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण दुर्दैवाने त्याला यश आले नाही.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर! 

वसई विरार महापालिका हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाला, तेव्हा अनेक डॉक्टरांनी कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्याकडे पाठ फिरवली होती. अशा वेळी डॉ. हेमंत पाटील यांनी स्वत: पुढाकार घेत शहरातील डॉक्टरांचे मनोबल वाढवून कोरोनाशी लढा देण्यास सुरुवात केली होती. डॉ हेमंत पाटील यांच्या पुढाकारानंतर वसई विरार नालासोपारा परिसरातील अनेक डॉक्टर यांनी कोरोनाला रोखण्याच्या लढाईत आपला सहभाग नोंदवला होता.

डॉ .हेमंत पाटील यांना डायबिटीस, बीपी यासारख्या व्याधी असतानाही वसई विरार नालासोपारामधील जनतेच्या सेवेसाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता त्यांनी कोरोनाच्या लढाईत उडी घेतली होती. वसईतील सर डी एम पेटिट रुग्णालयासाठी त्यांचा सिंहाचा वाटा आहे. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून उभारण्यात आलेल्या वसईतील कौल सिटी, अग्रवाल कोव्हीड सेंटरची निर्मिती ही त्यांच्या पुढाकारातून करण्यात आली होती.

हेही वाचा : भाजपचे खासदार कपिल पाटील यांना कोरोनाची लागण, कुटुंबातील आठ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

कोरोनाच्या लढाईत शेवटच्या क्षणापर्यंत लढा देत असताना मागच्या 10 दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोना योद्ध्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने वसई विरार महापालिका परिसरातील राजकीय, सामाजिक, आरोग्य विभागासह सर्वसामान्य नागरिकांवरही दुःखाचा डोंगर कोसळला

(Vasai Doctor Hemant Patil Dies of Corona)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.