AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वसईत कोरोना रुग्णांची लूट, 17 दिवसांचे बिल 4 लाख 72 हजार, नातेवाईकांचा आरोप

वसईत अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या 64 वर्षीय महिलेला 17 दिवसांचे 4 लाख 72 हजाराचे बिल दिले (Vasai Hospital Corona Patient get 4 lakh Bill) आहे.

वसईत कोरोना रुग्णांची लूट, 17 दिवसांचे बिल 4 लाख 72 हजार, नातेवाईकांचा आरोप
| Updated on: Jul 10, 2020 | 11:54 PM
Share

वसई : वसई विरार महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत (Vasai Hospital Corona Patient get 4 lakh Bill)  आहे. कोरोना रुग्णांच्या उपचाराच्या नावाखाली लूट सुरु असल्याचा आरोप होत आहे. वसईत प्लॅटिनम रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या 64 वर्षीय महिलेला 17 दिवसांचे 4 लाख 72 हजाराचे बिल दिले आहे. यातील अडीच लाख भरल्यानंतरही उर्वरित पैसे भरा, त्यानंतरच रुग्णाला सोडू असा पावित्रा रुग्णालय प्रशासनाने घेतला आहे. तसेच या पैशासाठी 8 ते 9 तास ताटकळत ठेवला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

वसई-विरार सुपर स्पेशालिटी प्लॅटिनम हॉस्पिटलमध्ये एका 64 वर्षीय रुग्णाला 23 जुलैला कोरोना झाल्याने दाखल करण्यात आलं. गेल्या 17 दिवसापासून त्याच्यावर उपचार सुरु होते. आज सकाळी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर त्याच्या नातेवाईकांना रुग्णालयाचे बिल देण्यात आले. तेव्हा मात्र त्यांना धक्काच बसला.

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

त्यांना 17 दिवसांच्या उपचाराचे 4 लाख 72 हजार 120 रुपये बिल देण्यात आले. त्यापैकी 2 लाख 47 हजार 500 रुपये बिल त्यांनी भरले. यात 60 हजार रोख आणि इतर मेडिक्लेम पास झाला होता. पण इतर पैसे त्यांच्याकडे भरण्यास नसल्याने त्यांनी रुग्णालय प्रशासनालाही विनंती केली. पण रुग्णालय त्यांनी पूर्ण पैसे भरल्याशिवाय सोडण्यास नकार दिला. या बिलात डॉक्टर व्हिजिट, फार्मसी चार्ज, पीपीई किट, बेड याचे सर्वाधिक चार्ज लावल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे.

याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाने विचारले असता त्यांनी हे आरोप फेटाळत बिल बरोबर असल्याचे सांगितले आहे. हा रुग्ण आमच्याकडे आला होता त्यावेळी त्याची परिस्थिती क्रिटिकल होती. त्याच्यावर कारवाई लागणाऱ्या उपचाराची सर्व माहिती रुग्णाच्या नातेवाईकांनी दिली होती. हा रुग्ण 25 दिवस रुग्णालयात होता. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. त्यामुळे आम्ही जे बिल लावले, ते बरोबर आहे, असे रुग्णालय प्रशासनाने दिले (Vasai Hospital Corona Patient get 4 lakh Bill) आहे.

संबंधित बातम्या : 

Thane Lockdown extension | ठाण्यात 19 जुलैपर्यंत लॉकडाऊन, काय सुरु, काय बंद?

उरण जंगलात शिकाऱ्यांचा हैदोस, मृतावस्थेत लांडोर सापडल्या, 4 शिकारी ताब्यात

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.