AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lakhapati Didi : लखपती दीदी चा नवीन विक्रम, भारतात इतक्या महिला झाल्या लखपती, मोदींनी थेट आकडाच सांगितला

Lakhpati Didi : भारतात लखपती दीदी योजनेने एक मोठा रेकॉर्ड केला आहे. देशभरात तळागाळातील महिला लखपती होत आहेत. देशात मोठा बदल आणल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. देशात इतक्या महिला लखपती झाल्या आहेत. पंतप्रधानांनीच सांगितला तो आकडा

Lakhapati Didi : लखपती दीदी चा नवीन विक्रम, भारतात इतक्या महिला झाल्या लखपती, मोदींनी थेट आकडाच सांगितला
लखपती दीदी
| Updated on: Aug 15, 2025 | 9:04 AM
Share

लखपती दीदी योजनेने एक मोठा रेकॉर्ड केला आहे. आज स्वातंत्र्यदिनी लालकिल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट आकडाच सांगितला. देशात नियो मीडिल क्लास तयार झाल्याचा दावा पंतप्रधानांनी केला आहे. देशात लखपती दीदींची संख्या वाढल्याचे त्यांनी सांगितले. मोदी सरकारने देशात 3 कोटी महिलांना लखपती करण्याचा पण केला आहे. डोळ्यासमोर उद्दिष्ट ठेवले आहे. आता देशात इतक्या महिला लखपती झाल्या आहेत. पंतप्रधानांनी तो आकडाच सांगितला.

लखपती दीदींचा नवीन रेकॉर्ड

मोदी सरकारने देशभरात 3 कोटी महिलांना लखपती करण्याचा संकल्प सोडला आहे. त्यातील 2 कोटी महिला लखपती झाल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. लखपती दीदीने मोठा रेकॉर्ड केल्याचे सूतोवाच त्यांनी केले. पंतप्रधानांनी लवकरच पुढील उद्दिष्ट पण गाठण्यात येईल असे स्पष्ट केले. त्यामुळे देशात महिला सबलीकरणाचा लक्ष्य गाठण्यात यश आल्याचे स्पष्ट होत आहे. आर्थिक सबलीकरणाच्या मोहिमेत महिलांचा वाटा वाढल्याचे ही आकडेवारी दर्शवते.

लखपती दीदी योजना काय?

मोदी सरकारने देशात लखपती दीदी योजना सुरू केली आहे. 15 ऑगस्ट 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिची घोषणा केली होती. आता त्याला दोन वर्षे उलटली आहे. महिलांची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी ही योजना आहे. काही राज्यात ही योजना या घोषणेपूर्वीच राबवण्यात येत होती. 4 नोव्हेंबर 2022 रोजीपासूनच ही योजना त्या राज्यात राबवण्यात येत होती. आता या योजनेला दोन वर्षे झाली आहेत.

देशात आता दोन कोटी महिला या लखपती झाल्याची घोषणा पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून केली. या योजनेत महिलांना सुक्ष्म कर्ज (Micro Credit) पुरवठा करण्यात येतो. महिलांना उद्योग, शिक्षण आणि इतर गरजांसाठी अल्प कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. या योजनेत तारण काही ठेवावे लागत नाही.

योजनेत प्रशिक्षणाची सोय

लखपती दीदी योजना केवळ कर्ज पुरवठा करत नाही तर महिलांना कौशल्य विकास आणि व्यावसायिक प्रशिक्षण ही देण्यात येते. जो व्यवसाय महिलांना करायचा आहे, त्याची इत्यंभूत माहिती आणि प्रशिक्षण देण्याचे काम योजनेतंर्गत करण्यात येते. प्लम्बिंग, एलईडी बल्ब, ड्रोन अशा अनेक व्यवसायांचे प्रशिक्षण या योजनेत देण्यात येते.

ही लागतात कागदपत्रं

१.लाभार्थ्याचे आधारकार्ड

२.पॅनकार्डची फोटोकॉपी

३.बॅकेचे पासबुक झेरॉक्स

४.शैक्षणिक कागदपत्रे

५.मोबाईल क्रमांक

६.पासपोर्ट आकाराचा फोटो

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.