AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

३ तास १३ मिनिटांचा तो चित्रपट.. पीएम मोदी यांचाही आवडता, मिळाले होते ७ फिल्मफेअर पुरस्कार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आणि बॉलीवूडचे नाते जुने आहे. मोदी यांचा आज ७५ वा वाढदिवस साजरा होत असताना त्यांच्या आवडत्या चित्रपटाबद्दल चर्चा सुरु आहे.

३ तास १३ मिनिटांचा तो चित्रपट.. पीएम मोदी यांचाही आवडता, मिळाले होते ७ फिल्मफेअर पुरस्कार
PM Narendra Modi Favorite hindi film
| Updated on: Sep 17, 2025 | 9:25 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ७५ वर्षांचे झाले.या निमित्ताने त्यांचे चाहते आणि बॉलीवूडच्या सेलिब्रिटी देखील त्यांचे अभिनंदन करत आहेत. सोशल मीडियावर पोस्ट लिहून त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करत आहेत. पीएम मोदी आणि बॉलीवूडचे नाते जुने आहे.बॉलीवूड हस्ती त्यांना खूप पसंद करत आहेत. या निमित्ताने एका चित्रपटाबद्दल चर्चा सुरु आहे, जो मोदी यांचा अत्यंत आवडता चित्रपट आहे. या देव आनंद यांनी लीड रोल केला होता. चला तर पाहूयात कोणता हा चित्रपट

देव आनंद यांचा हा चित्रपट १९६४ साली रिलीज झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजकारणात तर रस होता. तसेच त्यांना चित्रपट जगताशी देखील ममत्व होते आणि आहे. पीएम मोदी एकदा जम्मू-कश्मीर, लडाख आणि सिक्कीमच्या मुलांशी खास बातचीत करत होते. तेव्हा त्यांना त्यांचा आवडता चित्रपट कोणता हा प्रश्न मुलांनी विचारला. त्यावेळी त्यांनी या चित्रपटाचे नाव सांगितले.

सात वेळा मिळाले फिल्मफेयर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मुलाखती देव आनंद यांच्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘गाईड’ हा आपला आवडता सिनेमा असल्याचे सांगितले. त्यांनी या चित्रपटात ऑलटाईम फेव्हरेट फिल्म सांगितले. या चित्रपटाला १९६५ मध्ये प्रदर्शित केले होते. या चित्रपटाद्वारे देव आनंद यांनी सिनेमागृहात इतिहास रचला. गाईड दिग्दर्शन त्यांचे लहान बंधू विजय आनंद यांनी केले होते. ३ तास १३ मिनिटांच्या या चित्रपटपटाला ७ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले होते.

आर.के.नारायण यांच्या पुस्तकावर आधारित चित्रपट

गाईड या चित्रपटाची कथा आर.के.नारायण यांच्या पुस्तकावर आधारित आहे. या चित्रपटात एका टुरिस्ट गाईडची कथा चितारली आहे. जो नंतर पाण्याचा दुष्काळ संपवण्यासाठी अध्यात्माचा मार्ग पत्करतो. चांगली कथा असलेल्या चित्रपटाला खूप पसंद केले गेले. गाईड चित्रपटाला देव आनंद यांच्या करीयरचा आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट मानला जातो. या चित्रपटाचा उल्लेख देव आनंद यांच्या आत्मकथा ‘रोमान्सिंग विथ लाईफ’ मध्ये देखील आहे.

या पुस्तकात लिहीले आहे की देव आनंद यांनी आर.के. नारायण यांच्या त्यांच्या पुस्तकावर चित्रपट करण्याची परवानगी मागण्यासाठी फोन केला होता, तेव्हा ते अत्यंत उत्साहित झाले. त्यावेळी देव आनंद अमेरिकेत होते. आणि नारायण यांनी त्यांना भेटण्यासाठी बोलावले. आर.के. नारायण हे म्हैसूरमध्ये रहात होते. भारतात आल्यानंतर देव आनंद कारने बंगळुरुला गेले आणि पुस्तकाचे हक्क खरेदी करीत त्यांची मंजूरी घेतली.

हॉलीवूडमध्ये ही बनला होता ‘गाईड’

गाईड चित्रपट हॉलीवूडमध्येही बनला होता. आधी देव आनंद यांनी इंग्रजी चित्रपटासाठी याचे हक्क घेतले होते. नोबेल पुरस्कार विजेता पर्ल एस बक आरके यांच्या गाईड पुस्तकाने खूप प्रभावित झाले होते. त्यांनी चित्रपट बनवण्याची इच्छा प्रदर्शित केली. पर्ल यांनी आधीच विचार केला होता की हा चित्रपट देव आनंद यांना घेऊनच बनवायचा. परंतू हॉलीवूड निर्माते टॅड डेनिएलेवेक्सकी यांनी ही कहाणी देव आनंद यांना सांगितली तेव्हा ती त्यांना इतकी आवडली नाही आणि त्यांनी नकार दिला. त्यानंतर बर्लिन फिल्म फेस्टिव्हल दरम्यान देव आनंद आणि टॅड यांची पुन्हा भेट झाली. तेव्हा देव आनंद राजी झाले. हा या कादंबरीवर हॉलीवूडमध्ये ‘द गाईड’ बनवण्यात आला.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?