पोटाची खळगी भरण्यासाठी ‘तिने’ ओढली बैलगाडी; व्हिडीओ तुमचंही ह्रदय पिळवटून टाकेल !

विधवा महिलेने स्वतःला व मुलीला चक्क बैलगाडीला जुंपले आणि ही बैलगाडी तब्बल 15 किलोमीटर अंतरावर ओढत नेली.

पोटाची खळगी भरण्यासाठी 'तिने' ओढली बैलगाडी; व्हिडीओ तुमचंही ह्रदय पिळवटून टाकेल !
पोटाची खळगी भरण्यासाठी तिने ओढली बैलगाडीImage Credit source: Aaj Tak
Follow us
| Updated on: Sep 20, 2022 | 10:26 PM

मध्य प्रदेश : पोटाची खळगी भरण्यासाठी आजच्या जमान्यात सर्वसामान्यांना काय काय परिश्रम घ्यावे लागत आहेत. लोकांना बैलासारखे राबावे लागत आहे. एका विधवा महिला (Widow Women) व तिच्या मुलीचा व्हिडिओ (Video) पाहून तुम्हाला या कटू वास्तवाची प्रचिती येईल. विधवा महिलेने स्वतःला व मुलीला चक्क बैलगाडीला जुंपले आणि ही बैलगाडी (Bullock Cart) तब्बल 15 किलोमीटर अंतरावर ओढत नेली. याचा व्हिडिओ तुमचे ह्रदय पिळवटून टाकणार हे नक्की. या हृदयस्पर्शी व्हिडीओने सर्वांनाच हैराणच केले नाही, तर व्यवस्थेवर अनेक प्रश्नही उपस्थित केले आहेत.

व्हिडिओमध्ये महिला बैलगाडी ओढतेय

मध्य प्रदेशातील राजगढ येथून हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लक्ष्मीबाई नावाची महिला पाचोरेपासून 30 किमी अंतरावर असलेल्या सारंगपूरला आपल्या सामानासह आणि एका निष्पाप मुलीला बैलगाडीत ओढत जात असल्याचे दिसत आहे. त्यांनी सुमारे 15 किलोमीटरचे अंतर कापले होते.

मग वाटेत दोन लोकांची नजर त्या महिलेवर पडली. त्यांनी आपली मोटारसायकल थांबवून महिलेची विचारपूस कोली आणि तिला मदत करण्याचा प्रयत्न केला. त्याने महिलेच्या बैलगाडीला त्याच्या मोटरसायकलला दोरीने बांधून सारंगपूरला नेले.

हे सुद्धा वाचा

महिलेची परिस्थिती अतिशय बिकट

महिलेने सांगितले की तिचा नवरा मरण पावला आहे आणि तिला मोठ्या मुश्किलीने एक वेळचे जेवण मिळते. तिच्याकडे रहायला घर नाही, कुणी मदतीलाही पुढे येत नाही.

महिलेची मदतीसाठी विनंती

मी हात जोडून विनंती करतो की मला आणि माझ्या मुलीला मदत करावी. निदान मला दोन वेळचे अन्न तरी मिळू शकेल, अशी याचना महिलेने केली आहे.

महिलेच्या मदतीला शिक्षक धावून आला

देवी सिंह नागर नावाच्या शिक्षकाने महिलेला मदत केली. सिंह यांनी सांगितले की, ते आपल्या जोडीदारासोबत कुठेतरी जात होते. यावेळी बाईकवरुन जात असताना त्यांची नजर महिलेकडे गेली. महिला हातांनी बैलगाडी ओढत होती.

आम्ही बाईक थांबवून महिलेला मदत करण्याचा प्रयत्न केला. महिलेची विचारपूस केली असता तिला सारंगपूरला जायचे असल्याचे कळले. यानंतर एका दोरीने बैलगाडी दुचाकीला बांधली आणि तिला सारंगपूरला सोडले.

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.