AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhijeet Dipke: अभिजीत दीपके झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनात सहभागी होणार? त्या प्रश्नावर काय दिलं उत्तर? थेट म्हणाला…

Abhijeet Dipke: कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी रांची येथे सुरु असलेल्या विद्यार्थी आंदोलनावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी थेट राजकीय पक्षांच्या आंदोलनावर लाठीचार्ज होत नाही असे म्हटले आहे.

Abhijeet Dipke: अभिजीत दीपके झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनात सहभागी होणार? त्या प्रश्नावर काय दिलं उत्तर? थेट म्हणाला...
Abhijeet DipkeImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Aug 11, 2026 | 12:40 PM
Share

झारखंडमध्ये भरती परीक्षेत झालेल्या कथित घोटाळ्यावरून विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. रांचीमध्ये हजारो विद्यार्थी एकवटले असून जोरदार आंदोलन करत आहेत. या विद्यार्थ्यांनी विधानसभेच्या दिशेने कूच केली. विधानसभेपर्यंत जाण्याच्या मार्गात एकूण सहा बॅरिकेड्स होते. हे सहाही बॅरिकेड्स विद्यार्थ्यांनी पार केले. विद्यार्थी विधानसभेच्या अगदी जवळ आल्याने त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर पाण्याचा मारा केला आहे. त्यानंतर लाठीचार्ज केल्याचे समोर आले. आता यावर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते या आंदोलनात सहभागी होणार की नाही? हे त्यांनी सांगितले आहे.

काय म्हणाले अभिजीत दिपके?

नुकताच अभिजीत दीपके यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना रांची आंदोलनात सहभागी होणार का? असे विचारण्यात आले. त्यावे दीपके म्हणाले. देवेंद्र महतो हे झारखंडमध्ये जे काही चालू आहे ते त्याचे लीडर आहेत. त्यांनी जे नेतृत्व केले ते खूप चांगल्या पद्धतीने केलं आहे. आमची टीम तिथं आहे त्यांना समर्थन करत आहे. काल हॉस्पिटलमध्येसुद्धा आमची टीम त्यांच्यासोबत थांबली होती. आमच्या टीम सोबत कॉल झाला त्यांची माहिती घेतली. आमचा विचार हा आहे की जास्तीत जास्त विद्यार्थी कसे समोर येतील. देवेंद्र हे लीडर आहेत तिथे जाऊन आम्हाला हायजॅक नाही करायचं. आम्ही आमची टीम त्या ठिकाणी पाठवली आहे आम्ही त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट मध्ये आहोत.

आंदोलनावर प्रतिक्रिया देत ते म्हणाले, काल झारखंडमध्ये जे काही ते फार वाईट होते. 20 तारखेला जंतर मंतरमध्ये दृश्य होतं तसेच दृश्य झारखंडमध्ये पाहायला मिळाले. तेथे विद्यार्थांवर टीअर गॅस सोडण्यात आला, लाठीचार्ज करण्यात आला. मला हे कळतच नाहीये की जेव्हा एखादा राजकीय पक्ष आंदोलन करतो तेव्हा लाठीचार्ज किंवा टीअर गॅसचा वापर का केला जात नाही? हा टीअर गॅस आणि लाठीचार्ज नेहमी फक्त विद्यार्थ्यांवर का केला जात आहे?

पुढे अभिजीत दीपके म्हणाले, या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या देवेंद्र महतोजी यांच्याशी माझे बोलणे झाले. ते गेल्या ९ दिवसांपासून उषोण करत आहेत. त्यानंतरही पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. त्यांना मारण्यात आले आहे. ते सध्या रुग्णालयामध्ये आहेत. त्यांची प्रकृती आता चिंताजनक आहे. त्यामुळे कुठे तरी जाऊन सर्व सरकारला विचार करायला हवा की जंतर मंतर असो किंवा झारखंड असो विद्यार्थ्यांवर असे अत्याचार करुन काय मिळत आहे? हे विद्यार्थी त्यांच्या हक्कासाठी लढत आहेत. भविष्यासाठी लढत आहे कोणत्याही वोट बँकसाठी लढत नाहीत. त्यांच्यावर अशा प्रकारे लाठीचार्ज झाला नाही पाहिजे. त्यांना अशी क्रूरुपणाची वागूण मिळू नये.

विद्यार्थ्यांच्या मागण्या काय?

सरकार आणि विद्यार्थ्यांमधील मुख्य मुद्दा सीजीएल परीक्षेच्या अनुषंगाने आहे. या मुद्द्यावरच घोडं आडलं आहे. विद्यार्थ्यांनी सीजीएल परीक्षा रद्द करून या कथित घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. पण सरकार त्यावर सहमत नाहीये. एका निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली न्यायालयीन चौकशी करण्यात येईल, असं सरकारचं म्हणणं आहे. तसेच आर्थिक घोटाळा झाल्याचं समोर आल्यावर ईडी मार्फत चौकशी केली जाईल, असं सरकारने म्हटलं आहे. पण या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्याच्या मागणीवर विद्यार्थी अडून आहेत.

Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत