’15 लाख हिंदू मुलींचा डेटा इस्लामिक देशांना देणार’; ही धमकी नेमकी कोणी आणि का दिली, वाचा…

इस्लामिक देशांमध्ये राहणाऱ्या हिंदू मुलींचा डेटा सांगून आरोपी जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप कंपनीकडून करण्यात आला आहे.

'15 लाख हिंदू मुलींचा डेटा इस्लामिक देशांना देणार'; ही धमकी नेमकी कोणी आणि का दिली, वाचा...
Follow us
| Updated on: Jun 05, 2023 | 11:56 PM

जयपूर : राजस्थानमधील जयपूर येथील अंडर गारमेंट्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या एकाला धमकीचा मेल आला होता. त्या मेलमध्ये सांगितले होते की, जर कंपनीने 1 हजार ते दीड हजार डॉलर्स म्हणजेच 82 हजार रुपयांवरून 1.23 लाख रुपये भारतीय चलन पाठवले नाहीत तर तो त्या कंपनीची साइट हॅक करेल आणि 15 लाख हिंदू मुलींची माहिती इस्लामिक देशांना देणार असल्याची धमकी एका कर्मचाऱ्याला देण्यात आली होती. या धमकीनंतर कारवाई करत राजस्थान पोलिसांनी आरोपी संजय सोनी याला अटक केली आहे.

राजस्थान पोलिसांच्या एसओजीने सांगितले की, अंडर गारमेंट्स कंपनीच्या पोस्टधारकाने पोलिसात तक्रार दाखल केली होती.

त्यामध्ये त्यांनी सांगितले होते की 92 लाख महिला या कंपनीशी संबंधित आहेत. तर एका हॅकरने 24 एप्रिल रोजी कंपनीला मेल केला होता. त्यामध्ये 15 महिलांचा डेटा हॅक करून त्यांच्या कंपनीतून विकल्याचेही त्यांनी त्यामध्ये स्पष्ट केले होते.

त्यानंतर त्या आरोपीने 16 मे रोजी एक ट्विट केले होते की, 15 लाख हिंदू मुलींचा डेटा इस्लामिक देशांमध्ये पाठवला जाणार आहे.

त्यानंतर त्याने 25 मे रोजी कंपनीला मेल करून सुमारे 1.23 लाख रुपयांची लाच मागितली होती. तर दुसऱ्या दिवशी कंपनीने त्याला मेलद्वारे उत्तर देऊन त्याच्या ट्विटला उत्तर दिले होते.

इस्लामिक देशांमध्ये राहणाऱ्या हिंदू मुलींचा डेटा सांगून आरोपी जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप कंपनीकडून करण्यात आला आहे.

तर दुसरीकडे आरोपीने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ट्विट करून हिंदू मुलींना सावध राहण्याचा इशारा दिला होता.

तक्रारदाराचे वक्तव्य ऐकल्यानंतर मात्र त्याचे अकाऊंट तपासण्यात आले, व त्यानंतर एसओजीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

संजय सोनी असे या आरोपीचे नाव असून तो उदयपूरचा रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ज्या आरोपीने ही धमकी दिली आहे,

ती व्यक्तीही त्या अंडरगारमेंट्स कंपनीचाच एक भाग आहे. त्यामुळे या तक्रारीची दखल घेत आता पोलिसांनी कठोर कारवाई त्याच्यावर केली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.