राज्यांशी समन्वय साधून आरोग्य सुविधांचा आढावा घ्या; कोरोना व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर मोदींचे आदेश

विविध औषधांचा पुरेसा साठा असल्याची खात्री करण्यासाठी पंतप्रधानांनी अधिकार्‍यांना राज्यांशी समन्वय साधण्याचे निर्देश दिले. त्यांनी अधिकार्‍यांना लहान मुलांसाठीच्या उपचार सुविधांसह वैद्यकीय पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यासाठी राज्यांसोबत काम करण्यास सांगितले. पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना PSA ऑक्सिजन प्लांट्स आणि व्हेंटिलेटर सुविधांबाबत राज्यांशी समन्वय साधण्यास सांगितले.

राज्यांशी समन्वय साधून आरोग्य सुविधांचा आढावा घ्या; कोरोना व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर मोदींचे आदेश
PM Modi meeting on Omicron variant

नवी दिल्लीः देशातील कोविड परिस्थिती तसेच देशव्यापी लसीकरण मोहिमेवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्च अधिकाऱ्यांची बैठक शनिवारी उच्च अधिकाऱ्यांची बैठक घेतली. काल, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) Omicron ला अत्यंत संक्रामक व्हायरस म्हणून वर्गीकृत केले आहे. यानंतर ही तातडीची बैठक बोलवण्यात आली होती. दोन तासाच्या या बैठकीत अधिकार्‍यांनी पंतप्रधानांना ‘ओमिक्रॉन’ वेरिएंटचे वैशिष्ट्ये आणि विविध देशांमध्ये झालेल्या प्रभावाविषयी माहिती दिली. या वायरसचा भारतावर होणारे परिणामांची चर्चिले केली गेली.

राज्यांसोबत समन्वय साधून काम करण्याचे आदेश

पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय प्रवाशांकडून जीनोम सिक्वेन्सिंगचे नमुने गोळा करण्याचे निर्देश दिले. आंतरराष्ट्रीय प्रवास परत सामान्या करण्यातच्या योजनांचा आढावा घ्यावा आणि नविन वेरिएंटचा प्रभाव बघुन विमान सेवेबाबत निर्णाचा घ्यावा असे ही मोदींनी आदेश दिले. राज्य आणि जिल्हा स्तरावर योग्य जनजागृती व्हावी यासाठी राज्य सरकारांसोबत काम करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. व्हायर वेंटिलेशन आणि हवेतूनपण पसरतो, याची जागरूकता निर्माण करण्याची गरज असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले.

विविध औषधांचा पुरेसा साठा असल्याची खात्री करण्यासाठी पंतप्रधानांनी अधिकार्‍यांना राज्यांशी समन्वय साधण्याचे निर्देश दिले. त्यांनी अधिकार्‍यांना लहान मुलांसाठीच्या उपचार सुविधांसह वैद्यकीय पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यासाठी राज्यांसोबत काम करण्यास सांगितले. पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना PSA ऑक्सिजन प्लांट्स आणि व्हेंटिलेटर सुविधांबाबत राज्यांशी समन्वय साधण्यास सांगितले.

कॅबिनेट सचिव राजीव गौबा, पंतप्रधानांचे प्रधान सचिव पीके मिश्रा, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण आणि नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ व्ही के पॉल, आजच्या पंतप्रधानांच्या उच्च अधिकाऱ्यांची बैठकीत उपस्थित होते.

वेगाने पसरणाऱ्या नवीन व्हेरीयंटमुळे, भारत सरकारने सर्व राज्यांना दक्षिण आफ्रिका आणि इतर “हाई रिस्क ” देशांतील आंतरराष्ट्रीय प्रवाशांची जलद चाचणी आणि तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. Omicron व्हेरीयंट आतापर्यंत दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग, बोत्सवाना, इस्रायल आणि बेल्जियममध्ये पसरला आहे.

इतर बातम्या

Corona : ओमिक्रॉन व्हेरिएंट आला असतानाच मोठी बातमी, एकाच कॉलेजमधील 281 विद्यार्थ्यांना कोरोना

Omicron Variant: ओमिक्रॉन म्हणजे काय? कसा लागला या वेरिएंटचा शोध?

Maharashtra : ओमिक्रोन व्हेरिएंटचा महाराष्ट्राला किती धोका? देशासह राज्यात पुन्हा निर्बंध लागणार?

Published On - 6:01 pm, Sat, 27 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI