AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आपल्या AKASH ने फतेह-1 ला रोखलं, पाकिस्तानच मनोबल तोडलं, जाणून घ्या भारताच्या या हिरोबद्दल

Akash Air Defence System : कुठल्याही लढाईत शत्रूच मनोबल तोडणं आवश्यक असतं. सध्या सुरु असलेल्या युद्ध सदृश्य स्थितीत भारताच्या एअर डिफेन्स प्रणाली हेच काम करत आहेत. त्यात आपलं स्वदेशी बनावटीच आकाश मिसाइल आघाडीवर आहे. रशियाच्या S-400 च्या बरोबरीने आकाश डिफेन्स प्रणालीने आपल्या कामगिरीने सगळ्यांनाच थक्क केलय.

आपल्या AKASH ने फतेह-1 ला रोखलं, पाकिस्तानच मनोबल तोडलं, जाणून घ्या भारताच्या या हिरोबद्दल
Akash Missile
| Updated on: May 10, 2025 | 3:35 PM
Share

भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या युद्ध सदृश्य स्थिती आहे. तणावाने टोक गाठलं आहे. सलग तीन दिवसांपासून पाकिस्तानकडून भारतावर ड्रोन आणि मिसाइल हल्ल्याचा प्रयत्न सुरु आहे. भारताने आतापर्यंत बरेच हल्ले हवतेच परतवून लावले आहेत. पाकिस्तानी ड्रोन्स आणि मिसाईल्स हवेतच नष्ट केली आहेत. पाकिस्तानने फेतह-1 मिसाइल, JF-17, F-16 आणि DJI सैन्य ड्रोनचा हल्ल्यासाठी वापर केला. पाकिस्तानकडून आलेली ही अस्त्र हवेतच संपवण्यात आकाश एअर डिफेन्स सिस्टिमने महत्त्वाची भूमिका बजावली. पाकिस्तानी हल्ले पूर्णपणे फेल ठरवले.

आकाश ही भारताची स्वदेशी बनावटीची जमिनीवरुन हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) आकाश एअर डिफेन्स सिस्टिम विकसित केली आहे. भारतीय सैन्य आणि एअर फोर्समध्ये 2014 साली ही सिस्टिम तैनात करण्यात आली. त्याचं पुढचं वर्जन आकाश-NG (नेक्स्ट जेनरेशन) 2021 मध्ये समावेश करण्यात आलं. ही प्रणाली कमी आणि मध्यम उंचीवरील हवाई धोके, फायटर जेट्स, ड्रोन आणि क्रूज मिसाइल नष्ट करण्यासाठी बनवली आहे.

वैशिष्ट्य

रेंज : 45-70 किमी (आकाश-NG)

लक्ष्य : फाइटर जेट्स, ड्रोन, क्रूज मिसाइल आणि बॅलेस्टिक मिसाइल्स

मार्गदर्शन : रडार-आधारित कमांड गाइडेंस आणि एक्टिव रडार होमिंग (आकाश-NG)

वॉरहेड : 60 किलोग्राम उच्च-विस्फोटक

अचूकता : 90-100% इंटरसेप्शन दर

तैनाती : मोबाइल लॉन्चर, टँक आणि ट्रकवर तैनात

इलेक्ट्रॉनिक काउंटरमेजर्स (ECCM) : शत्रुची जॅमिंग आणि इलेक्ट्रॉनिक हस्तक्षेप निष्क्रिय करण्यास सक्षम. स्वदेशीकरण : 96% अधिक स्वदेशी घटक, ज्यामुळे ‘मेक इन इंडिया’ प्रतीक.

आकाशची ताकद काय?

आकाश मिसाइलने मागच्यावर्षी चार टारगेट उद्धवस्त करण्यात आली होती. भारत जगातील पहिला असा देश आहे, जो एका मिसाइल युनिटने चार एरियल टार्गेट उद्धवस्त करतो. आकाश मिसाइस सिस्टिमच्या सिंगल युनिटमध्ये चार मिसाइल असतात, जे वेगवेगळे टार्गेट्स उद्धवस्त करतात.

फतेह-1 कसं उडवलं?

9 मे रोजी पंजाबमध्ये डागण्यात आलेलं फतेह-1 मिसाइल आकाश-NG ने हवेतच नष्ट केलं. मिसाइल जसं आकाशच्या रेंजमध्ये (70 किमी) मध्ये आलं. त्याला ट्रॅक करुन इंटरसेप्ट करण्यात आलं.

ड्रोन स्वार्म्स: आकाशने DJI सैन्य ड्रोन आणि अन्य ड्रोन स्वार्म्सला निष्प्रभावी केल. जो श्रीनगर, बारामूला आणि भुज येथे हल्ल्याचा प्रयत्न करत होते. आकाशची ECCM क्षमता आणि रडार अचूकता महत्त्वपूर्ण आहे.

मिसाइल हल्ले : पंजाब आणि राजस्थानमध्ये PL-15 आणि AMRAAM मिसाइल्सला आकाशने हवेतच नष्ट केलं. आकाश मिसाइलच्या ग्राउंड सिस्टिमला अपग्रेड करण्यात आलं आहे. त्याशिवाय राडार, EOTS आणि टेलीमेट्री स्टेशन, मिसाइल ट्रॅजेक्टरी आणि फ्लाइट पॅरामीटर्समध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

देशात आकाशचे 3 वेरिएंट आहेत

पहिलं आकाश MK- याची रेंज 30KM आहे.

दूसरं आकाश MK 2 – रेंज 40KM आहे.

तिसरं आकाश NG – रेंज 80KM आहे.

आकाश-एनजी 20 km उंचीवर जाऊन शत्रूच विमान आणि मिसाइल नष्ट करु शकतं.

अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.