नव्या वर्षात 60 हजार बालकांचा जन्म, अल्का लांबा म्हणतात, ‘यात भाजप खासदारचंही योगदान’

लहान मुलांच्या जन्म दराच्या आकडेवारीवरुन काँग्रेस नेत्या अल्का लांबा यांनी भाजप खासदार मनोज तिवारी यांना टोला लगावला (Alka Lamba attack on bjp MP Manoj Tiwari)

नव्या वर्षात 60 हजार बालकांचा जन्म, अल्का लांबा म्हणतात, 'यात भाजप खासदारचंही योगदान'

मुंबई : सोशल मीडियावर सध्या नवा वाद चर्चेत आला आहे. यावेळी चर्चेचं कारण कोणताही फोटो किंवा व्हिडीओ नाही तर लहान मुलांची जन्म दराची आकडेवारी आहे. लहान मुलांच्या जन्म दराच्या आकडेवारीवरुन काँग्रेस नेत्या अल्का लांबा यांनी भाजप खासदार मनोज तिवारी यांना लगावलेल्या टोल्याबाबत ही चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे सोशल मीडिया दोघांच्या बाजूने कमेंट दिल्या जात आहेत. हे प्रकरण नेमकं काय आहे, याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत (Alka Lamba attack on bjp MP Manoj Tiwari).

नेमकं प्रकरण काय?

भाजप खासदार मनोज तिवारी 1 जानेवारी 2020 रोजी पुन्हा एकदा बाबा बनले आहेत. त्यांच्या घरी मुलीने जन्म घेतला. त्या दिवशी देशभरात जवळपास 60 हजार बालकांचा जन्म झाला. नव वर्षाच्या सुरुवातीला भारतात सर्वाधिक मुलांनी जन्म घेतला, अशी माहिती UNICEF ने दिली. मात्र, याच मुद्द्यावरुन अल्का लांबा यांनी मनोज तिवारी यांना ट्विटरवर टोला लगावला (Alka Lamba attack on bjp MP Manoj Tiwari).

“देशात एका दिवसात 60 हजार मुलांचा जन्म झाला आहे. यामध्ये दिल्लीच्या भाजप खासदाराची देखील भूमिका राहिली आहे. त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा”, असा चिमटा अल्का लांबा यांनी काढला आहे. त्यांच्या या कमेंटवर मनोज तिवारी यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, सोशल मीडियावर त्यांच्या ट्विटला अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अल्का लांबा यांच्या ट्विटवरुन काही लोकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. तर काही लोकांनी त्यांचं समर्थन करत मनोज तिवारींवर निशाणा साधला आहे. अल्का लांबा यांच्या ट्विटला संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

हेही वाचा : भाजपमध्ये हिंमत असेल तर अहमदाबादचं नाव बदलून कर्णावती करा, मिटकरींंचं आव्हान

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI