संरक्षण मंत्रालयाची सर्वात मोठी घोषणा ! भारत स्वत: बनवणार फिफ्थ जनरेशनचं फायटर प्लेन
भारताने स्वदेशी पाचव्या पिढीचे लढाऊ विमान (AMCA) विकसित करण्याची घोषणा केली आहे. हे विमान स्टेल्थ तंत्रज्ञान आणि सुपरक्रूज क्षमता यांसारख्या अत्याधुनिक वैशिष्ट्यांनी युक्त असेल. DRDO आणि खासगी कंपन्यांच्या सहकार्याने हे प्रकल्प पूर्ण केला जाईल. यामुळे भारताची संरक्षणक्षमता वाढेल आणि देशातील एरोस्पेस क्षेत्रात आत्मनिर्भरता निर्माण होईल.

शस्त्रास्त्राच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्याचा भारताकडून सातत्याने प्रयत्न केला जात आहे. पाकिस्तानसोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या स्वदेशी शक्तीला संपूर्ण जगाने पाहिलं आहे. आता भारताने स्वदेशी जेट बनवण्याची तयारी सुरू केली आहे. संरक्षण मंत्रालयाने फायटर प्लेनचे पहिले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. याचं नाव उन्नत मध्यम लढाऊ विमान (Advanced Medium Combat Aircraft (AMCA) असं ठेवण्यात आलं आहे. पाचव्या जनरेशनचं हे प्लेन असेल. हा प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी DRDOकडे सोवण्यात आली आहे. DRDOने यापूर्वीही असे असंख्य स्वदेशी शस्त्र तयार केले होते. तसेच हे शस्त्र बनवण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंजुरीही दिली आहे.
याबाबत संरक्षण मंत्रालयाने माहिती दिली आहे. भारत स्वदेशी संरक्षण क्षमता वाढवण्यासाठी आणि देशांतर्गत मजबूत एअरोस्पेस औद्योगिक पारिस्थितिकी तंत्राला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू केला आहे, असं संरक्षण मंत्रालयाने म्हटलं आहे. तर उन्नत मध्यम लढाऊ विमान कार्यक्रम निष्पादन मॉडलला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंजुरी दिली आहे.
एअरोनॉटिकल डेव्हल्पमेंट एजन्सी उद्योग भागिदारीच्या माध्यमातून कार्यक्रम क्रियान्वित करण्यासाठी तयार आहे. हे एएमसीए प्रोटोटाइप विकसित करण्यासाठी स्वदेशी विशेषज्ञता, क्षमता आणि सामर्थ्याचा उपयोग करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. त्यामुळे एअरोस्पेस क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दिशेने मैलाचा दगड ठरणार आहे.
स्टिल्थ तंत्रज्ञानाचा समावेश
एअरोनॉटिकल डेव्हल्पमेंट एजन्सी ही डीआरडीओच्या अंतर्गत काम करते. आता या योजनेचं नेतृत्व करत आहे. एडीएने खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांसोबत भागिदारीच्या माध्यमातून या योजनेला गती देण्याची योजना तयार केली आहे. हा सहयोगात्मक दृष्टीकोण केवळ नवनिर्मितीला प्रोत्साहन देणार नाही, तर स्वदेशी संरक्षण उद्योगात रोजगार सृजन आणि आर्थिक विकासालाही प्रोत्साहित करेल. एएमसीएच्या प्रोटोटाइपच्या विकासासाठी स्वदेशी तज्ज्ञ आणि उन्नत तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाईल. यात स्टिल्थ तंत्रज्ञान, सुपरक्रूज क्षमता, उन्नत सेन्सर आणि शस्त्र प्रणाली असणार आहे. त्यामुळे देशाच्या शस्त्र सज्जतेला मोठा फायदा होणार आहे.
