AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुरक्षित पर्याय म्हणून राहुल गांधी दोन मतदारसंघातून लढण्याच्या तयारीत?

अमेठी : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणेच दोन मतदारसंघातून लढण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातील अमेठी हा राहुल गांधींचा मतदारसंघ आहे. पण केरळमधील वायनाड मतदारसंघातून लढण्याची कार्यकर्त्यांची मागणी असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे. अमेठीसाठी राहुल गांधींची उमेदवारी काँग्रेसच्या पहिल्या यादीतच जाहीर झाली. पण दुसऱ्या मतदारसंघाबाबत अजून निर्णय झालेला नाही. 2014 ला राहुल गांधींची […]

सुरक्षित पर्याय म्हणून राहुल गांधी दोन मतदारसंघातून लढण्याच्या तयारीत?
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM
Share

अमेठी : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणेच दोन मतदारसंघातून लढण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातील अमेठी हा राहुल गांधींचा मतदारसंघ आहे. पण केरळमधील वायनाड मतदारसंघातून लढण्याची कार्यकर्त्यांची मागणी असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे. अमेठीसाठी राहुल गांधींची उमेदवारी काँग्रेसच्या पहिल्या यादीतच जाहीर झाली. पण दुसऱ्या मतदारसंघाबाबत अजून निर्णय झालेला नाही. 2014 ला राहुल गांधींची बालेकिल्ल्यातच दमछाक झाली होती. भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांनी त्यावेळी 23 दिवसांचा प्रचार करत तीन लाख मतं मिळवली होती. त्यामुळे राहुल गांधींसाठी यावेळीही अमेठीची निवडणूक तारेवरची कसरत असेल.

काँग्रेसचा बालेकिल्ला, मतदारसंघाचा इतिहास

1967 ला निर्मिती झालेला अमेठी मतदारसंघ हा नेहरु-गांधी कुटुंबाचा बालेकिल्ला आहे. 2014 पर्यंत या मतदारसंघात काँग्रेसला जिंकण्यासाठी कधीही कसरत करावी लागली नाही. 1967 च्या पहिल्या निवडणुकीत विद्याधार वाजपेयी हे काँग्रेसचे अमेठीचे पहिले खासदार ठरले. त्यानंतर काँग्रेसचंच या मतदारसंघात वर्चस्व राहिलं. काँग्रेसला या मतदारसंघात पहिला धक्का हा आणीबाणीनंतर झालेल्या म्हणजे 1977 च्या निवडणुकीत लागला. जनता पार्टीच्या रवींद्र प्रताप सिंह यांनी काँग्रेसचे दिवंगत नेते संजय गांधी यांचा पराभव केला. पण तीन वर्षातच झालेल्या निवडणुकींमध्ये संजय गांधी हे मोठ्या फरकाने निवडून आले.

1980 च्या सार्वजनिक निवडणुकीनंतर काही दिवसातच संजय गांधी यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आणि त्यांच्या जागी त्यांचे बंधू राजीव गांधी यांनी निवडणूक लढवली. या पोटनिवडणुकीत राजीव गांधी तब्बल सव्वा दोन लाखांच्या फरकाने निवडून आले होते. राजीव गांधींनी या मतदारसंघातून सलग चार वेळा निवडणूक जिंकली. राजीव गांधींच्या हत्येनंतर काँग्रेसचे सतिश शर्मा हे सलग दोन वेळा म्हणजे 1998 पर्यंत अमेठीचे खासदार राहिले. पण भाजपने पहिल्यांदाच 1998 च्या निवडणुकीत अमेठीत खातं उघडलं आणि भाजपचे डॉ. संजय सिंग हे निवडून आले. 1999 ते 2004 या काळात यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी अमेठीतून निवडून आल्या. 2004 च्या लोकसभा निवडणुकीत सोनिया गांधींनी हा मतदारसंघ मुलगा राहुल गांधींसाठी सोडला आणि त्या रायबरेलीतून लढल्या. राहुल गांधींनी 2004, 2009 आणि 2014 ची निवडणूक अमेठीतून जिंकली. सध्या ते चौथ्यांदा या मतदारसंघातून उमेदवार आहेत.

प्रियांका गांधींचा करिष्मा चालेल?

राहुल गांधी हे दशभरात सभा घेत असताना त्यांची बहीण प्रियांका गांधी या अमेठी आणि रायबरेलीची जबाबदारी सांभाळत असतात. सध्या त्या सक्रिय राजकारणात आल्या असल्या तरी त्यापूर्वीपासून त्यांनी या मतदारसंघांची धुरा सांभाळलेली आहे. पण काँग्रेसला या दोन जागांसाठी काही अपवाद वगळता कधीही संघर्ष करावा लागला नाही. दर निवडणुकीत लाखोंच्या फरकाने निवडून येणारे राहुल गांधी 2014 मध्ये फक्त 1 लाख 7 मतांनी निवडून आले. यानंतर 2017 मध्ये उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक झाली. या निवडणुकीत काँग्रेसने सपासोबत आघाडी केलेली असतानाही काँग्रेसचा अमेठीतून सुपडासाफ झाला.

विधानसभेसाठी प्रियांका गांधींनी अमेठीची जबाबदारी सांभाळली होती. राहुल गांधी स्वतः तळ ठोकून होते. पण विधानसभा निवडणुकीत भाजपने लढलेल्या 384 जागांपैकी 312 जागा जिंकत विरोधकांचा सुपडासाफ केला. काँग्रेसच्याही पूर्वीपेक्षा जागा कमी झाल्या. अमेठीत पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी चार आमदार भाजपचे आहेत. त्यामुळे अमेठीत काँग्रेसला यावेळी संघर्ष करावा लागणार आहे.

अमेठीतील विधानसभा मतदारसंघ

तिलोई – मयंकेश्वर शरण सिंह, भाजप

सलोन – दल बहादूर, भाजप

जगदीशपूर – सुरेश कुमार, भाजप

गौरीगंज – राकेश प्रताप सिंह, सपा

अमेठी – गरीमा सिंग, भाजप

राहुल गांधींचं सावध पाऊल

काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरल्यास राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील हे निश्चित आहे. त्यामुळे पंतप्रधानपदाचा उमेदवार सुरक्षित जागेवरुन लढावा यासाठी काँग्रेस प्रयत्नशील असल्याची माहिती आहे. यासाठी केरळमध्ये काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्य वायनाडमधून राहुल गांधींना लढवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. कार्यकर्त्यांनी वायनाडमधून लढण्याचा आग्रह केल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.