AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Fact Check : भारतात पुन्हा कोरोनाने दोघांचा मृत्यू? सत्य काय? महत्वाची माहिती समोर

andhra pradesh : भारतात कोरोनाने पुन्हा एन्ट्री दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे.

Fact Check : भारतात पुन्हा कोरोनाने दोघांचा मृत्यू? सत्य काय? महत्वाची माहिती समोर
| Updated on: Jul 10, 2026 | 1:18 PM
Share

आंध्र प्रदेशात कोरोनामुळे 4 वर्षांपूर्वी एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा कोरोनाची एन्ट्री झाल्याचा दावा करण्यात येत आहे.  आंध्रपदेशच्या कडप्पा जिल्ह्यात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आहे. तर 5 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचा दावा सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून करण्यात येत आहे. त्यातील काही जणांना घरात विलगीकरणात ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय, परंतु सोशल मीडियावरील हा दावा अर्धसत्य आणि खोटे असल्याचं समोर आलं आहे.

आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh)  दोघांचा खरंच कोरानामुळे मृत्यू झाला आहे का, याची फॅक्ट चेक टीमने पडताळणी केली. त्यानंतर टीमने मोठा खुलासा केला. आंध्रप्रदेशात कोणत्याही व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झालेला नाही. आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यात कोविड झाल्याची नोंद केलेल्या रुग्णांकडे प्रशासनाचं बारकाईने लक्ष आहे. आरोग्य विभागाचे अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. परंतु खोटी माहिती पसरवणे आणि लोकांमध्ये भीती निर्माण करणे गुन्हा आहे, असा इशारा प्रशासनाने नेटकऱ्यांना दिला आहे.

सरकारी जाहीर केलेल्या तपशिलानुसार, कडप्पा जिल्ह्यात कोरोनाचे पाच रुग्ण आढळले आहेत. वीरा रेड्डी यांच्यावर मधुमेह, उच्च रक्तदाबाचे उपचार सुरू होते. आजारातून बरे झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. जी. कोंडय्या यांच्यावर शासकीय रुग्णालयात मधुमेह, क्षयरोग, इतर आजारांवर उपचार सुरू आहेत. अक्षत (25) यांना कोरोनाची (Corona) सोम्य लक्षणे असल्याने त्यांना घरातच विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे.

दोघांना होते गंभीर आजार 

एन. सुब्बारायुडू (52) हे मधुमेह आणि उच्च रक्तदाबाने त्रस्त होते. गंभीर आजारामुळे 28 जून त्यांचं निधन झालं. सय्यद मबाशा हे दीर्घकाळ मद्यपानाचे व्यसन होते. या व्यसनामुळे त्यांना गंभीर आजार झाला होता. त्यामुळे त्यांचं 7 जुलै रोजी निधन झालं. सरकारच्या (Government) दाव्यानुसार, दोन्ही मृत रुग्णांना दीर्घकालीन आजाराच्या समस्या होत्या. त्यामुळे त्यांच्या मृत्यूला कोरोनाचे कारण देणे योग्य नसल्याचे सांगण्यात आलं आहे. या  रुग्णांचे नमुने हे जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

Follow Us
नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....
Nana Patekar : नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....
मुंबईकरांनो, उकाड्यासाठी तयार राहा; ऑक्टोबरमध्ये तापमान 37.6 अंशांवर
Mumbai Heat Wave : मुंबईकरांनो, उकाड्यासाठी तयार राहा; ऑक्टोबरमध्ये तापमान 37.6 अंशांवर, हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी
केंद्रीय पथक आज शेतीच्या बांधावर; दुष्काळी स्थितीचा अहवाल थेट.....
Maharashtra Drought : केंद्रीय पथक आज शेतीच्या बांधावर; दुष्काळी स्थितीचा अहवाल थेट दिल्लीत पाठवणार
महापौरांच्या प्रसिद्धीसाठी जनतेच्या पैशांतून 25 लाख? महापालिकेच्या....
Mumbai Ritu Tawade : महापौरांच्या प्रसिद्धीसाठी जनतेच्या पैशांतून 25 लाख? मुंबई महापालिकेच्या प्रस्तावावरून वाद 
सोने-चांदीच्या आयातीवर तब्बल एवढे टक्के कर लागू होणार
Gold-Silver : सोने-चांदीच्या आयातीवर तब्बल एवढे टक्के कर लागू होणार; सरकारच्या निर्णयाचा नेमका अर्थ काय?
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाना यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
Nana Patekar Passes Away : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
Nana Patekar Passes Away | कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या..
Shivsena Supreme Court Hearing : उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या वकिलांनी पक्षाच्या घटनेवरच उपस्थित केला सवाल, म्हणाले...
पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत...
Pune Vidhan Parishad Election : पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत चर्चा व्हायला हवी होती... प्रफुल पटेल यांचा रोख नेमका कोणाकडे?
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ....
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ सोडण्याचा इशारा, नेमकं काय घडलं?