Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगित करण्याच्या निर्णयावर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया
Indus Water Treaty : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बऱ्याच दिवसानंतर टीव्ही कॅमेऱ्यासमोर येऊन पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर आपलं मत मांडलं. आज पहलगाम दहशतवादी हल्ल्याला आठवडा होत आहे. अजूनही देशात वेगवेगळ्या ठिकाणी या दहशतवादी हल्ल्याविरोधात आंदोलन सुरु आहेत.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सगळ्या देशात संतापाच वातावरण आहे. भारतातूनच नाही, परदेशात जिथे कुठे भारतीय वास्तव्याला आहेत, तिथून पाकिस्तान विरुद्ध कारवाई करण्याची मागणी होत आहे. पाकिस्तानला धडा शिकवा, भरपूर झालं, आत्ता यांना सोडायच नाही, अशीच सगळ्या देशाची भावना आहे. आज पहलगाम दहशतवादी हल्ल्याला आठवडा होत आहे. अजूनही देशात वेगवेगळ्या ठिकाणी या दहशतवादी हल्ल्याविरोधात आंदोलन सुरु आहेत. भारत सरकारने सुद्धा एकाही दहशतवाद्याला सोडणार नाही, कल्पनेपलीकडची शिक्षा दिला जाईल हे स्पष्टपणे सांगितलं आहे. पाकिस्तान पुरस्कृत या दहशतवाद्यांनी धर्म विचारुन हल्ला केला.
महिलांसमोर त्यांचं कुंकू पुसलं. पुरुष पर्यटकांवर गोळ्या झाडण्याआधी त्यांच्या पॅन्ट कमरेखाली खेचलेल्या होत्या. एकप्रकारे या दहशतवाद्यांनी अत्यंत नीचता दाखवली. त्यामुळे पाकिस्तानच्या नांग्या आता ठेचाच हाच प्रत्येक देशवासियाचा आवाज आहे. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटी, नेते, समाजसेवक कारवाईची मागणी करत आहेत. बऱ्याच दिवसानंतर टीव्ही कॅमेऱ्यासमोर येऊन समाजसेवक अण्णा हजारे यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर आपलं मत मांडलं. अण्णा हजारे हे माजी सैनिक आहेत. अण्णा हजारे भारतीय लष्करात होते.
अण्णा हजारे काय म्हणाले?
“पर्यटकांवर हल्ला करणं हा सर्वात मोठा दोष आहे. ते पर्यटक आहेत. ते तुमच्या हिंदुस्तान पाकिस्तान इथून आलेले नाहीत. त्यांचा संबंध नाही. त्यांच्याशी संबंध लावणं बरोबर नाही. सर्वात महत्त्वाच म्हणजे सिंधू नदीच पाणी जर थांबलं, नाक दाबलं तर तोंड उघडतं अशी म्हण आहे. नाक दाबलं तर तोंड आपोआप उघडेल म्हणून ही कृती करण गरजेच आहे” असं अण्णा म्हणाले. अण्णा हजारे यांनी सिंधू जल करार स्थगित करण्याच्या निर्णयाच समर्थन केलं.
पाकिस्तानचे धाबे दणाणले
भारत सरकारने पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्याचदिवशी काही निर्णय घेतले. यात पाकिस्तानातून आलेल्या नागरिकांचा व्हिसा तात्काळ रद्द करणं, सिंधू जल कराराला स्थगिती असे काही निर्णय घेतलं. सिंधू जल कराराला स्थगिती देण्याच्या निर्णयामुळे पाकिस्तानचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. त्यांच्याकडून थेट युद्धाची भाषा सुरु झाली आहे.
