कोरोनाबाबत नवी नियमावली जाहीर; परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांना सक्तीचे क्वारंटाईन

नव्या नियमावलीनुसार परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांजवळ 72 तासांच्या आतील कोरोना निगेटीव्हचे प्रमाणपत्र आसणे आवश्यक आहे. ज्या देशात ओमिक्रॉनचा सर्वाधिक धोका आहे, अशा देशातून आलेल्या प्रत्येक प्रवाशांची विमानतळावर पुन्हा एकदा कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.

कोरोनाबाबत नवी नियमावली जाहीर; परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांना सक्तीचे क्वारंटाईन
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्ली : कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेल्या ओमिक्रॉनमुळे (Omicron) खळबळ उडाली आहे. दक्षिण अफ्रिकेसह 12 देशांमध्ये कोरोनाचा हा नवा व्हेरियंट आढळून आला आहे. दक्षिण आफ्रिके(South Africa)वरून कर्नाटकात आलेले दोन प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आढळून आले होते. आता त्या पाठोपाठ डोंबिवलीतही दक्षिण आफ्रिकेवरून आलेला एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. डोंबिवलीत केपटाऊन (Cape Town) शहरातून आलेल्या एका प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याचे आरोग्य विभागाच्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून केंद्रीय आरोग्य विभागाकडून परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी आज नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

‘अशी’ आहे नवी नियमावली

नव्या नियमावलीनुसार परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांजवळ 72 तासांच्या आतील कोरोना निगेटीव्हचे प्रमाणपत्र आसणे आवश्यक आहे. ज्या देशात ओमिक्रॉनचा सर्वाधिक धोका आहे, अशा देशातून आलेल्या प्रत्येक प्रवाशांची विमानतळावर पुन्हा एकदा कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. तर ज्या देशामध्ये कोरोनाचा धोका कमी आहे, अशा नागरिकांची रॅंडम पद्धतीने कोरोना चाचणी करण्यात येईल. कोरोना चाचणी झाल्यानंतर जर संबंधित व्यक्तीचा रिपोर्ट हा पॉझिटीव्ह आला तर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येईल. परदेशातून आलेल्या प्रत्येक व्यक्तीला सात दिवसांसाठी होम क्वॉरंटाईनची सक्ती करण्यात आली आहे. होम क्वॉरंटाईचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांची पुन्हा एकदा आठव्या दिवशी कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.

ओमिक्रॉनचा समावेश चिंताजनक विषाणूमध्ये

नवी नियमावली जाहीर करताना आरोग्य विभागाने म्हटले आहे की, जगावरील कोरोना संकट कमी होत आहे, असे वाटत असतानाच पुन्हा एकदा कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमिक्रॉन आढळून आला आहे. दक्षिण अफ्रिकेमध्ये सर्वप्रथम या विषाणुने बाधित रुग्ण सापडले. जागतिक आरोग्य संघटनेने या विषाणुचा समावेश हा चिंताजनक कॅट्यागरीमध्ये केला आहे. या पार्श्वभूमीवर भारतामध्ये खबरदारीचे उपय म्हणून ही नवी नियमावली आजपासून जाहीर करण्यात आली आहे.

कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन

दरम्यान कोरोनापासून वाचण्यासाठी नागरिकांनी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करावे, सॅनिटायझरचा नियमित वापर करावा. योग्य सोशल डिस्टन्सिंग ठेवावे, घराच्या बाहेर पडताना मास्क घालावे, घरी आल्यानंतर नियमित स्वच्छ हात धुवावेत अशा सूचना देखील आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा प्रसार आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व त्या आवश्यक उपाययोजना येत्या काळात करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या 

संसदेत प्रश्न विचारा, सरकारच्या धोरणाविरोधात आवाज बुलंद करा, आम्ही खुल्या चर्चेला तयार, पण शांतताही राखा; मोदींचं विरोधकांना आवाहन

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्राची नवी नियमावली; 12 देशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांवर घातली बंधने

संसदेचं आजपासून होणारं हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार, एमएसपी, महागाई विरोधकांच्या अजेंड्यावर

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI