AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जंतरमंतरवर आरक्षणाच्या विरोधात आंदोलन, वातावरण तापलं; मोदी सरकारमधील 2 मंत्र्यांनी भूमिका केली स्पष्ट

देशात आरक्षणाच्या विरोधात पुन्हा आंदोलन करण्यात आलं. यावरून मोदी सरकारमधील दोन मंत्र्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

जंतरमंतरवर आरक्षणाच्या विरोधात आंदोलन, वातावरण तापलं; मोदी सरकारमधील 2 मंत्र्यांनी भूमिका केली स्पष्ट
ramdas athawale and chirag paswan Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Aug 23, 2026 | 9:27 AM
Share

नवी दिल्लीच्या जंतर-मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचं नीट पेपरफुटीविरोधात आंदोलन यशस्वी झालं. त्यानंतर काही दिवसांनी सोशल मीडियावर आरक्षणाच्या विरोधातही आंदोलन तापलं होतं. एका संघटनेने आरक्षणाच्या विरोधात दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलनाची घोषणा केली होती. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांपूर्वी काही आंदोलक जंतरमंतरवर आंदोलनासाठी उतरले. परंतु पोलिसांनी आंदोलन मोडीत काढल्याची माहिती मिळतेय. या आंदोलनामुळे देशात पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मोदी सरकारमधील दोन केंद्रीय मंत्री चिराग पासवान आणि रामदास आठवले यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

देशात आर्थिक आधारावर आरक्षण देण्याची मागणी केली जात आहे. या मागणीवर मंत्री पासवान म्हणाले, ‘आरक्षणाविषयीचा गैरसमज पसरल्याने मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये नाराजी पसरू शकते. मोदी सरकारने आधीच आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गांसाठी 10 टक्क्यांचं आरक्षण लागू केलं आहे, असेही पासवान यांनी स्पष्ट केलं.

आंदोलनाला तेजस्वी यादव यांचा पाठिंबा, चिराग पासवान म्हणाले…

पाटण्यातील विद्यार्थी आंदोलनाला तेजस्वी यादव यांनी पाठिंबा दिलाय. त्यावर पासवान म्हणाले, ‘बिहार विधानसभा विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी सभागृहात कामकाजादरम्यान उपस्थित राहून मुद्दे उपस्थित केले असते, तर अधिक चांगले झाले असते. आता उशीर झाला तरी विरोधी पक्षनेते म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. ही चांगली गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. कोणालाही दुर्लक्षित करू नये. सगळ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचावा. त्यासाठी यादव यांनी प्रयत्न केला पाहिजे’.

आरक्षण हटवण्याची मागणी असंविधानिक – रामदास आठवले 

केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, ‘काही लोक आरक्षण हटवण्याची मागणी करत आहे. आरक्षण हटवण्यासाठी सोशल मीडियावर अभियान चालवलं जात आहे. आंदोलकांकडून जंमरमंतरवर आंदोलन करून आरक्षण हटवण्याची मागणी केली जात आहे. सोशल मीडियावर आरक्षण हटवणे किंवा सुधारणा आणण्याची मागणी केली जात आहे. परंतु आरक्षण हटवले जाऊ शकत नाही. आरक्षण आमचा संविधानिक अधिकार आहे’. दिल्लीच्या जंतरमंतरवरील आरक्षणविरोधी आंदोलनानंतर मोदी सरकारमधील दोन बड्या मंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केल्याचे समोर आलं आहे.

Follow Us
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, ‘सिनेसृष्टीतल ही पोकळी भरून निघणार नाही’
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते...
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते; 45 सीपीआर दिला मात्र...  काय घडलं?
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला- सुप्रिया सुळे
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला, मी... सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील...
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्याची भावनिक प्रतिक्रिया
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार...
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार, रोहित पवारांची मोठी माहिती
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात