AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

7 महिने झाले तरी सीरिजची क्रेझ कायम! नवा कंटेंट आला तरी लोकप्रियता तशीच, IMDb वर दमदार रेटिंग

फक्त सात एपिसोड्सची ही थ्रिलर वेब सीरिज प्रदर्शनाच्या जवळपास सात महिन्यांनंतरही ओटीटी प्लॅटफॉर्मवर ट्रेंडिंग यादीत आपलं स्थान टिकवून आहे. वीकेंडला काय पहावं, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर कथेला खिळवून ठेवणारी ही सीरिज तुम्ही पाहू शकता.

| Updated on: Aug 23, 2026 | 8:17 AM
Share
ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला नवनवीन वेब सीरिज आणि चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. त्यामुळे एखादी सीरिज काही दिवसांपेक्षा जास्त काळ प्रेक्षकांमध्ये चर्चेत राहणं हीच मोठी गोष्ट आहे. मात्र एका क्राइम थ्रिलरने तब्बल सात महिन्यांनंतरही नेटफ्लिक्सवर आपली पकड कायम ठेवली आहे. अवघ्या सात एपिसोड्सची ही सीरिज सध्या पुन्हा चर्चेत आली आहे.

1 / 5
या सीरिजमध्ये अभिनेता इमरान हाश्मीने कस्टम सुपरिटेंडेंट अर्जुन मीना ही भूमिका साकारली आहे. मुंबई विमानतळावर सुरू असलेल्या मोठ्या तस्करीच्या नेटवर्कचा पर्दाफाश करण्याची जबाबदारी त्याच्यावर असते. आंतरराष्ट्रीय तस्करीच्या या जाळ्यामागे असलेल्या मोठ्या गुन्हेगारापर्यंत पोहोचण्यासाठी अर्जुन आणि त्याची टीम प्रयत्न करत असते. त्याचवेळी प्रत्येक टप्प्यावर त्यांच्यासमोर नवी आव्हानं आणि कथेत ट्विस्ट येतात.

2 / 5
या सीरिजमध्ये शरद केळकरने बडा चौधरी नावाच्या तस्करीच्या नेटवर्कच्या प्रमुखाची भूमिका साकारली आहे. त्यामुळे इमरान हाश्मी आणि शरद केळकर यांच्यातील संघर्ष हा सीरिजचा महत्त्वाचा भाग ठरतो. या सीरिजचं नाव आहे 'तस्करी : द स्मगलर्स'. याचे एकूण सात एपिसोड्स आहेत. प्रत्येक एपिसोड साधारण 38 ते 58 मिनिटांचा आहे. त्यामुळे मोठ्या कथानकात न अडकता वीकेंडला ही सीरिज सहज पूर्ण करता येते.

3 / 5
IMDb वर या वेब सीरिजला दहापैकी 7.1 रेटिंग मिळाली आहे. या वेब सीरिजचं दिग्दर्शन नीरज पांडे यांनी केलं आहे. यामध्ये इमरान हाश्मी आणि शरद केळकर यांच्याशिवाय नंदिश संधू, अनुराग सिन्हा, अमृता खानविलकर, झोया अफरोज, अनुजा साठे आणि जमील खान यांच्याही भूमिका आहेत.

4 / 5
'तस्करी: द स्मगलर्स' ही वेब सीरिज 14 जानेवारी 2026 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली होती. रिलीजच्या पहिल्याच आठवड्यात या सीरिजने नेटफ्लिक्सच्या नॉन-इंग्लिश टीव्ही यादीत पहिलं स्थान मिळवलं होतं. त्यानंतरही ती बराच काळ टॉप 10 मध्ये राहिली. त्यामुळे नवीन कंटेंटच्या गर्दीतही या सीरिजला मिळणारा प्रतिसाद विशेष मानला जात आहे.

5 / 5
Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...