तुम्हालाही वाटते सापाची भीती? करा फक्त ‘हे’ तीन सोपे उपाय, साप कधीच जवळ येणार नाही
अनेकांना सापाची भीती वाटते, मात्र असे काही उपाय आहेत, ज्यामुळे साप तुमच्या आसपासही फिरकणार नाही, या उपयांबद्दल आज आपण जाणून घेऊयात.

सापांबाबत अनेक गैरसमज आहेत, आपल्याला दिसणारा प्रत्येक साप हा विषारीच असतो हा त्यातील सर्वात मोठा गैरसमज आहे. त्यामुळे आपल्याला साप दिसला की आपण लगेच त्याला मारून टाकतो. मात्र यामुळे सापाच्या अनेक दुर्मिळ प्रजाती सध्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. साप हा विषारी असो अथवा बिनविषारी त्याला मारता कामा नये, साप हा शेतकऱ्यांचा मित्र असतो, त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या घराच्या आसपास किंवा इतर कुठेही कोणताही साप दिसला तर सर्वात आधी त्याची माहिती सर्पमित्रांना द्या, सर्पमित्र या सापांना सुरक्षित त्यांच्या आधीवासात पुन्हा सोडतील.
विषारी सापांबाबत बोलायचं झाल्यास भारतामध्ये विषारी सापांच्या केवळ 4 च प्रमुख प्रजाती आढळतात त्यांना आपण बिग फोर या नावानं देखील ओळखतो. त्यामध्ये मण्यार, फुरसे, घोणस आणि नाग या चार प्रजातींचा समावेश आहे. भारतामध्ये अनेक बिनविषारी सापांच्या प्रजाती आढळून येतात. त्यामुळे साप दिसल्यास घाबरून न जाता, त्याला पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न न करता त्याची माहिती सर्पमित्रांना द्या. आज आपण अशा काही उपयांबद्दल जाणून घेणार आहोत, जामुळे साप तुमच्या घरात किंवा परिसरात येणार नाही.
सर्पगंधा – तुम्ही तुमच्या घरासमोर किंवा कुंडीत सर्पगंधा नावाच्या वनस्पतीचं रोप लावू शकतात, या वनस्पतीला तीव्र असा वास असतो. या वसामुळे साप या परिसरात सुद्धा फिरकत नाही. सर्पगंधा वनस्पतीमुळे साप तुमच्या घरापासून दूर राहातील.
झेंडू – झेंडूच्या फुलांचा वास हा खूप सुवासिक असतो. धार्मिक कार्यामध्ये झेंडूच्या फुलांचा वापर मोठा प्रमाणात होतो. झेंडूच्या झाडाचा आणि फुलांचा आणखी एक उपयोग म्हणजे याचा वास हा सापांना सहन होतं नाही, त्यामुळे ज्या ठिकाणी झेंडूचं रोप आहे, त्या परिसरात साप फिरकत नाहीत.
लसून – मसाल्यांच्या पदार्थांमध्ये लसनाला खूप महत्त्व आहे, मात्र याच्या वासामुळे देखील साप तुमच्या घराच्या आसपास फिरकत नाहीत.
गवती चहा – गवती चहाला देखील एक विशिष्ट वास असतो, याच्या विशिष्ट वासामुळे साप तुमच्या घरात प्रवेश करत नाही.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.
