AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Arvind Kejriwal : दिल्लीत सगळ्यांना मोफत वीज बंद! 1 ऑक्टोबरपासून मागणी करतील त्यांनाच सबसिडी, केजरीवालांची घोषणा

दिल्लीत आता सरसकट सगळ्यांना मोफत वीज मिळणार नाही. 1 ऑक्टोबरपासून जे सबसिडीची मागणी करतील त्यांनाच ही सोय उपलब्ध असेल, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केले आहे. ज्यांना ही सबसिडी नको असेल त्यांना वीजेचे बिल यापुढे भरावे लागणार आहे.

Arvind Kejriwal : दिल्लीत सगळ्यांना मोफत वीज बंद! 1 ऑक्टोबरपासून मागणी करतील त्यांनाच सबसिडी, केजरीवालांची घोषणा
अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री दिल्लीImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: May 05, 2022 | 7:38 PM
Share

नवी दिल्ली : दिल्लीत आता सरसकट सगळ्यांना मोफत वीज मिळणार नाही. 1 ऑक्टोबरपासून जे सबसिडीची मागणी करतील त्यांनाच ही सोय उपलब्ध असेल, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी जाहीर केले आहे. ज्यांना ही सबसिडी नको असेल त्यांना वीजेचे बिल (Light Bill) यापुढे भरावे लागणार आहे. केजरीवाल यांनी सांगितले की, अनेकजण भेटतात ते सांगतात की आम्हाला वीजेची सबसिडी नको आहे. तुम्ही या पैशांचा उपयोग शाळा उघडण्यासाठी आणि रुग्णालयांसाठी खर्च करा. याचमुळे दिल्ली सरकारने (Delhi Government) हा निर्णय घेतला आहे. जर दिल्लीकरांची मागणी असेल तरच आम्ही त्यांना मोफत वीज देऊ अन्यथा देणार नाही.

मोफत वीजेची घोषणा आणि अन्य महत्त्वाच्या घोषणांमुळे अरविंद केजरीवाल दिल्लीत सत्तेत परतले होते. त्यानंतर आपने पंजाबमध्येही निवडणुका जिंकत पंजाबही काबीज केले आहे. गोव्यातही आपने निवडणुकांत आपले नशीब आजमावले होते. आगामी विधानसभा निवडणुकांत महाराष्ट्रासह इतर राज्यांतही केजरीवाल यांच्या आपची जादू दिसल्याशिवाय राहणार नाही.

दिल्ली मंत्रिमंडळाने स्टार्ट अप पॉलिसीलाही दिली मंजुरी

दिल्ली सरकारने तरुणांसाठी आणखी एक नवी जोयना सुरु केली आहे, त्या योजनेची घोषणाही गुरुवारी अरविंद केजरीवाल यांनी केली. जे तरुण स्वताचे स्टार्टअप सुरु करण्यासाठी प्रयत्नशील आहेत, त्यांना आता दिल्ली सरकार मदत करणार आहे. त्यांना पैशांबरोबर इतरही बाबतीत सरकार मदत करायला तयार असल्याचे केजरीवांलांनी सांगितले. या तरुणांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत देणार असल्याचेही केजरीवालांनी सांगितले.

अभ्यासासाठी दोन वर्षांची सुट्टी देण्याची तयारी!

केजरीवाल म्हणाले, दिल्लीतील कोणत्याही कॉलेजमध्ये शिकत असलेला विद्यार्थी, स्टार्टअप सुरु करु इच्छितो किंवा ज्यांनी एखादा प्रोजेक्ट तयार केला आहे, त्यांना अभ्यासासाठी दोन वर्षांची सुट्टी देण्याची सरकारची तयारी आहे. यामुळे पुढची दोन वर्षे या विद्यार्थ्यांना आपल्या प्रोजेक्टसाठी पूर्णवेळ लक्ष देऊन काम करता येईल.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.