Ram Mandir : राम मंदिरासाठी धनवर्षा, दानाची मोजणी करताना थकताय 14 कर्मचारी

Ayodhya Ram mandir Donation | राम मंदिरात दर्शनासाठी आधी 20 ते 25 हजार भाविक येत होते. आता मागील दहा दिवसांपासून हा आकडा दोन ते अडीच लाख रोज होत आहे. आधी प्रतिदिन 20 ते 25 हजार रुपये देणगी येत होती. आता गेल्या दहा दिवसांत 25 कोटी रुपये आले आहेत.

Ram Mandir : राम मंदिरासाठी धनवर्षा, दानाची मोजणी करताना थकताय 14 कर्मचारी
Ram Mandir
Follow us
| Updated on: Feb 04, 2024 | 10:47 AM

अयोध्या, दि.4 फेब्रुवारी 2024 | राम मंदिरात 22 जानेवारीला रोजी रामलल्ला विराजमान झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीला झाल्यानंतर मंदिर सर्वसामान्य भाविकांसाठी खुले झाले आहे. मंदिरात आता लाखो भाविक दर्शनासाठी येत आहेत. यामुळे मंदिराच्या दानभेटीत धनवर्षा सुरु आहे. ऑनलाईन पद्धतीने मंदिरासाठी मोठे दान येत आहेत. मंदिरात येणाऱ्या देणगीची मोजणी करण्यासाठी 14 कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. त्यात 11 बँकेचे कर्मचारी तर 3 बँकेचे कर्मचारी आहेत. दानपेटीत भरभरुन दान येत असल्यामुळे दिवसभरात अनेक वेळा दानपेटी रिकामी करावी लागत आहे. 14 कर्मचारी दान मोजून थकून जात आहेत.

10 संगणकीय काउंटरवर देणगी

राम मंदिर ट्रस्टकडून मिळालेल्या माहितीनुसार प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर आतापर्यंत जवळपास 25 लाखांपेक्षा अधिक रामभक्तांनी रामलल्लाचे दर्शन घेतले आहे. 22 जानेवारी ते 1 फेब्रुवारीपर्यंत दान पेटीत भक्तांनी 8 कोटींपेक्षा अधिक दान दिले आहे. तसेच 3.50 कोटी रुपये ऑनलाइन मिळाले आहे. रामभक्त चार दानपेटीत दान देत आहेत तसेच उघडण्यात आलेल्या 10 संगणकीय काउंटरवर देणगी देण्यासाठी भाविकांच्या रांगा लागत आहेत. दानपेटीत आलेली देणगी मोजण्याची संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्हीच्या निगराणीत होते असते, असे श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट कार्यालयचे प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी सांगितले.

आधी 20 ते 25 हजार आता दोन ते अडीच लाख

राम मंदिरात दर्शनासाठी आधी 20 ते 25 हजार भाविक येत होते. आता मागील दहा दिवसांपासून हा आकडा दोन ते अडीच लाख रोज होत आहे. आधी रोज 20 ते 25 हजार रुपये देणगी येत होती. आता गेल्या दहा दिवसांत 25 कोटी रुपये आले आहेत. सर्व बँक कर्मचारी दान केलेल्या पैशांची मोजणी करतात आणि दान केलेले पैसे दररोज संध्याकाळी राम मंदिर ट्रस्टच्या कार्यालयात जमा करतात. ही संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली होते.

हे सुद्धा वाचा

राम मंदिरात दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येत आहेत. यामुळे देणगी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. रामलल्लाच्या दर्शनासाठी देशातूनच नाही तर परदेशातून ही लोकं येत आहेत.

हे ही वाचा

इस्त्राईलच्या एंटी ड्रोनमुळे अयोध्या राम मंदिराची अभेद्य सुरक्षा, शत्रूंचा हवेतच खात्मा होणार

Non Stop LIVE Update
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?.
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात...
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात....
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान.
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला.
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ.
तर खूप जड जाणार,जरांगेंचा मुंडे बंधू भगिनींवर गंभीर आरोप अन दिला इशारा
तर खूप जड जाणार,जरांगेंचा मुंडे बंधू भगिनींवर गंभीर आरोप अन दिला इशारा.
युपीत प्रयागराजमध्ये राहुल गांधी, अखिलेश यादवांच्या सभेला तुफान गर्दी
युपीत प्रयागराजमध्ये राहुल गांधी, अखिलेश यादवांच्या सभेला तुफान गर्दी.
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.