AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baba Vanga Predictions : ज्याची भीती होती तेच घडणार; बाबा वेंगांनी सांगितली जगाच्या अंताची तारीख, नवी भविष्यवाणी समोर

बाबा वेंगा यांनी रशियाचं विभाजन, अमेरिकेवर झालेला दहशतवादी हल्ला 9/11, हिटलरचा मृत्यू अशा अनेक भविष्यवाणी केल्या होत्या, त्या खऱ्या ठरल्याचा दावा केला जातो.

Baba Vanga Predictions : ज्याची भीती होती तेच घडणार; बाबा वेंगांनी सांगितली जगाच्या अंताची तारीख, नवी भविष्यवाणी समोर
| Updated on: Feb 05, 2025 | 7:00 AM
Share

प्रत्येक व्यक्तीला त्याचं भविष्य जाणून घेण्याची इच्छा असते. आपल्या आयुष्यात पुढे काय होणार आहे? हे लोकांना जाणून घ्यायचं असतं. जगात असे अनेक भविष्यवेत्ता आहेत, जे आपल्या भविष्यवाणीमुळे प्रसिद्ध आहेत. जगात असे काही भविष्यवेत्ता आहेत ज्यांच्या भविष्यवाणीवर जगभरातील लोक विश्वास ठेवतात. अशा भविष्यकारांमध्ये फ्रान्सचा भविष्यवेत्ता नास्त्रोदम आणि बुल्गारियाची भविष्यवेत्ता बाबा वेंगा यांचा सर्वात आधी समावेश होतो. नास्त्रेदमने 500 वर्षांपूर्वी केलेल्या अनेक भविष्यवाणी खऱ्या ठरल्याचा दावा केला जातो. तसेच बाबा वेंगा यांनी केलेल्या भविष्यवाणी देखील खऱ्या ठराल्याचं बोललं जातं.

बाबा वेंगा यांनी रशियाचं विभाजन, अमेरिकेवर झालेला दहशतवादी हल्ला 9/11, हिटलरचा मृत्यू अशा अनेक भविष्यवाणी केल्या होत्या, त्या खऱ्या ठरल्याचा दावा केला जातो. बाबा वेंगा यांचा जन्म बुल्गारियामध्ये 1911 साली झाला.1996 रोजी वयाच्या 86 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. असं म्हटलं जात की एका वादळात सापडल्यामुळे बाबा वेंगा यांनी आपली दृष्टी गमावली आणि तेव्हापासूनच त्यांना दिव्य दृष्टीची प्राप्ती झाली, त्या भविष्यातील घटना पाहू शकत होत्या. बाबा वेंगा यांनी 5079 पर्यंतची भविष्यवाणी करून ठेवली आहे, त्यातील अनेक भविष्यवाणी या अत्यंत भयानक आहेत, आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

जगाचा अंत कधी होणार ?

जगाचा अंत कधी होणार? तो कसा असेल असा प्रश्न अनेकांना पडतो त्याबाबत बाबा वेंगा यांनी भविष्यवाणी केली आहे. बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे की जगाच्या अंताला सुरुवात 2025 पासून होईल, युरोपीयन देशांमध्ये एका मोठ्या राजकीय संघर्षाला सुरुवात होईल. 2028 साली मानवांच्या हाती एक मोठा उर्जेचा स्त्रोत लागेल, तसेच 2033 नंतर ध्रुवीय बर्फ वितळण्याची प्रक्रिया प्रचंड गतीमान होऊन समुद्राच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ होईल आणि पृथ्वीवर नवं संकट येईल असं बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे. बाबा वेंगा यांनी वर्तवलेल्या भविष्यवाणीनुसार 2170 ला जगभरात भयानक दुष्काळ पडेल तोच जगाचा अंत असेल असं बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.