2 मुलांच्या आईचं बॅचलर शेजाऱ्याशी जुळलं सूत, नवऱ्याला कळताच त्याने केली अनोखी डील…
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये एका इसमाला कळलं की त्याच्या पत्नीचे शेजाऱ्यासोबतच प्रेमसंबंध आहेत. हे समजल्यानंतर पतीने एक अनोखी डील केली आणि असा निर्णय घेतला की सगळेच हैराण झाले. त्याच्या या निर्णयाची आता सर्वत्र चर्चा होत आहे.

माणूस प्रेमात पडला की त्याला भलं -बुरं काही समजत नसतं. आपण काय करतो हेही कधीकधी कळत नाही. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये, दोन मुलांची आई असलेल्या महिलेचं तिच्या शेजारी राहणआऱ्या, 9 वर्षांनी लहान असलेल्या तरूणाशीच सूत जुळलं. दोघांचही अफेअर सुरू झालं. मात्र ही गोष्ट त्या महिलेच्या पतीला कळली, त्यानंतर त्याने जो अनोखा निर्णय घेतला, तो ऐकून संपूर्ण परिसरच काय अख्खं शहर हैराण झालंय. बायकोचं शेजाऱ्याशी प्रेमप्रकरण असल्याचं कळताच पतीन मन मोठं केलं आणि हसत हसत पत्नीला तिच्या प्रियकराकडे सोपवलं. मात्र त्यापूर्वी त्याने एक अनोखी डील केली, त्याचीच सगळीकडे चर्चा आहे. ती डील म्हणजे, त्याने पत्नीला सांगितलं की त्यांच्या दोन्ही मुलींचा सांभाळ, पालनपोषण तिनेच करायचं.
विसेष म्हणजे पतीच्या या निर्णयावर पत्नीनेही समहती दर्शवली. मग ती तिच्या दोन्ही मुलींसह शेजारी राहणाऱ्या प्रियकराच्याच घरी निघून गेली. या प्रकरणाची सध्या आसपासच्या परिसरात बरीच चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार,12 वर्षांपूर्वी फुलपूर कोतवाली अंतर्गत येणाऱ्या अमिलिया गावातील चंद्रभान पटेल यांचा विवाह उत्तराव पोलीस ठाण्याअंतर्गत मोतीहा गावात राहणाऱ्या आरती पटेलशी झाला होता. त्यांना दोन मुलीही आहेत.
मात्र लग्नानंतर काही वर्षांनी आरती ही तिच्यात शेजारी राहणाऱ्या करण पटेलच्या प्रेमात पडली. त्याचंही तिच्यावर प्रेम जडलं. परिस्थिती अशी आली की ते दोघेही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते. ते एकमेकांना गुपचूप भेटत असत. त्यांचे अनेक वेळा शारीरिक संबंधही आले. मात्र एके दिवशी हो गोष्ट आरतीचा पती चंद्रभानला कळली. त्याने पत्नीची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. आपल्याला 2 मुली आहेत, त्यांचे संगोपन कसे होईल, लोक काय म्हणतील? पण आरतीचं काही तिच्या प्रियकरावरील प्रेम कमी झालं नाही.
शेजाऱ्याला सोपवली पत्नी
अखेर गुरुवारी आरतीचा पती, चंद्रभान याने तहसीलमध्ये प्रतिज्ञापत्र देऊन पत्नीला घटस्फोट दिला आणि आरतीवला तिच्या प्रियकराच्या स्वाधीन केले. तिचा प्रियकर करणही, आनंदाने आपल्या प्रेयसीला सोबत घेऊन गेला. मात्र त्यापूर्वी पती चंद्रभान याने एक डील केली. त्या करारात असे ठरवण्यात आलं होतं की आरती, हीच त्यांच्या दोन आणि चार वर्षांच्या दोन्ही मुलींचे संगोपन करेल. यावेळी आरतीचे वडील देखील उपस्थित होते.
प्रियकर तर 9 वर्षांनी लहान
त्या महिलेचा प्रियकर करण हा अवघ्या 21 वर्षांचा आहे आणि त्याचं अद्याप लग्न झालेलं नाही. तो आरतीपेक्षा, त्याच्या प्रेयसीपेक्षा नऊ वर्षांनी लहान असल्याचे सांगितले जात आहे. आरती ही यापूर्वीही शेजाऱ्यासोबत पळून गेली होती. पण नंतर ती परत आली होती असे सांगितले जात आहे. मात्र आता तिच्या पतीच्या या अनोख्या निर्णयाची सर्वत्र चर्चा होत आहे.
