Bank Holidays : एप्रिलमध्ये इतके दिवस बँका राहणार बंद
1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होणार आहे. या सोबतच नवीन महिना देखील सुरु होतोय. पण तुम्हाला माहित आहे की देशभरात विविध सणांमुळे आणि सुट्ट्यांमुळे १४ दिवस बँका बंद राहणार आहेत. कधी कुठे बँका बंद राहणार आहेत जाणून घ्या.

Bank Holidays in April 2024 : एप्रिल महिन्यात बऱ्याच सुट्ट्या येत आहेत. एप्रिल 2024 मध्ये विविध झोनमध्ये एकूण 14 दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. अनेक लोकं आता बँकांशी संबंधित अनेक कामेही ऑनलाइन करु लागले आहेत. पण तरी देखील काही गोष्टींसाठी बँकेत जावे लागते. बँक खाते उघडणे, कर्ज घेणे अशी अनेक कामे करण्यासाठी बँकेत जावे लागते. बँकेच्या सुट्ट्यांची यादी न पाहता बँकेच्या शाखेत गेल्यास तुमची देखील निराशा होऊ शकते. याशिवाय तुमचे महत्त्वाचे कामही थांबू शकते. अशा परिस्थितीत बँकेला सुट्ट्या कधी आहेत हे आधीच जाणून घ्या. दर आठवड्याच्या रविवारी आणि महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकेला सुट्टी असते.
एप्रिल 2024 मध्ये या दिवशी बँकांना सुट्ट्या
1 एप्रिल 2024: आर्थिक वर्षाच्या शेवटी बँक खाती बंद झाल्यामुळे 1 एप्रिल रोजी बँकेला सुट्टी असेल.
5 एप्रिल 2024: बाबू जगजीवन राम यांचा वाढदिवस आणि जुमात-उल-विदा यानिमित्ताने श्रीनगर, जम्मू आणि तेलंगणामध्ये बँकेला सुट्टी असेल.
7 एप्रिल 2024: रविवारमुळे बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.
9 एप्रिल 2024: गुढी पाडवा/उगादी सण/तेलुगु नववर्ष आणि पहिल्या नवरात्रीमुळे बेलापूर, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, इम्फाळ, जम्मू, मुंबई, नागपूर, पणजी आणि श्रीनगरमध्ये बँकेला सुट्टी असेल.
10 एप्रिल 2024: ईदमुळे कोची आणि केरळमध्ये बँका बंद राहतील.
11 एप्रिल 2024: ईदनिमित्त देशभरात बँका बंद राहतील.
13 एप्रिल 2024: दुसऱ्या शनिवारमुळे बँका बंद राहतील.
14 एप्रिल 2024: रविवारमुळे बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.
15 एप्रिल 2024: हिमाचल दिनानिमित्त गुवाहाटी आणि शिमला झोनमध्ये बँका बंद राहतील.
17 एप्रिल 2024: श्री रामनवमीमुळे अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, डेहराडून, गंगटोक, हैदराबाद, जयपूर, कानपूर, लखनौ, पाटणा, रांची, शिमला, मुंबई आणि नागपूर येथे बँकेला सुट्टी असेल.
20 एप्रिल 2024: गरिया पूजेमुळे आगरतळा येथे बँकेला सुट्टी असेल.
21 एप्रिल 2024: रविवारमुळे बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.
27 एप्रिल 2024: चौथ्या शनिवारमुळे बँकेला सुट्टी असेल.
28 एप्रिल 2024: रविवारमुळे बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.
