AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्रीचे जेवण केलं, नंतर.. टॉयलेटमध्ये सापडला बँक मॅनेजरचा मृतदेह, मेघराजसोबत नेमकं काय घडलं!

31 वर्षीय बँक मॅनेजर मेघराज यांचा मृतदेह पबच्या बाथरूममध्ये रहस्यमयी परिस्थितीत सापडली. नेमकं त्यांच्यासोबत काय घडलं? जाणून घ्या नेमकं काय घडलं?

रात्रीचे जेवण केलं, नंतर.. टॉयलेटमध्ये सापडला बँक मॅनेजरचा मृतदेह, मेघराजसोबत नेमकं काय घडलं!
Bank ManagerImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Oct 12, 2025 | 11:50 AM
Share

रात्री साधारण साडेदहा वाजेचा सुमार होता. मेघराज आपल्या तीन मित्रांसह त्या पबमध्ये ड्रिंक आणि जेवणासाठी आले होते. मित्रांच्या सांगण्यानुसार, सर्व काही अगदी सामान्य होते. सगळ्यांनी हसत-खेळत जेवण केले, बिल भरले आणि बाहेर निघण्याची तयारी करू लागले. तेव्हाच मेघराज म्हणाले, ‘मला थोडी चक्कर येत आहे, मी बाथरूमला जात आहे.’ ते उठले आणि आत गेले. मित्रांनी बाहेर उभे राहून त्यांची वाट पाहिली… पाच मिनिटे, दहा मिनिटे, मग वीस मिनिटे झाली. पण मेघराज परत आलेच नाहीत. मित्रांनी पबच्या आत जाऊन प्रत्येक कोपरा शोधला. शेवटी जेव्हा बाथरूमचा दरवाजा आतून बंद असल्याचे आढळले, तेव्हा सर्वांना संशय आला. पबच्या मॅनेजरला बोलावण्यात आले. बराच वेळ दरवाजा ठोठावल्यानंतरही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मग जेव्हा दरवाजा तोडला गेला, तेव्हा आतले दृश्य पाहून सर्वांचे धाबे दणाणले.

बाथरूममध्ये सापडला मेघराजचा मृतदेह

बँक मॅनेजर मेघराज फरशीवर पडले होते, त्यांच्या जवळ त्यांचा मोबाइल पडला होता आणि सिंकखाली एक तुटलेला ग्लास दिसला. तिथे उपस्थित सर्वजण स्तब्ध झाले. पोलिसांना तातडीने माहिती देण्यात आली. डीसीपी (पश्चिम) एस. गिरीश यांनी सांगितले की, सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की मेघराज स्वतः बाथरूममध्ये गेले, त्यांनी दरवाजा आतून बंद केला आणि त्यानंतर काही मिनिटांपर्यंत कोणतीही हालचाल झाली नाही. जेव्हा दरवाजा तोडला गेला, तेव्हा खूप उशीर झाला होता.

वाचा: BCCI अध्यक्ष मिथुन मन्हास करतायेत भारतीय क्रिकेटपटूच्या पत्नीला डेट? एका Photoमुळे चर्चांना उधाण

पोलिसांनी सीन ऑफ क्राइम टीमला बोलावून सर्व पुरावे गोळा केले. आता पोस्टमॉर्टम अहवालाची वाट पाहिली जात आहे. पोस्टमॉर्टम अहवालातून मृत्यूचे खरे कारण समोर येईल.

मेघराज कोण होते?

मेघराज एका खासगी बँकेत मॅनेजर होते. घरी त्यांची पत्नी आणि फक्त सहा महिन्यांचे मूल आहे. जेव्हा कुटुंबाला ही बातमी कळली, तेव्हा घरात हाहाकार माजला. पोलिसांनी मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे आणि आता प्रत्येक दृष्टिकोनातून तपास सुरू आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?