AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bihar Election 2025 Schedule : बिहारमध्ये विधानसभेसाठी दोन टप्प्यात मतदान, जाणून घ्या एका क्लिकवर संपूर्ण निवडणूक कार्यक्रम

Bihar Election 2025 Voting and Result Date : बिहार विधानसभा निवडणुकीसंदर्भात आज निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये बिहार विधानसभा निवडणुकीसंदर्भातील महत्त्वाच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे.

Bihar Election 2025 Schedule : बिहारमध्ये विधानसभेसाठी दोन टप्प्यात मतदान, जाणून घ्या एका क्लिकवर संपूर्ण निवडणूक कार्यक्रम
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Oct 14, 2025 | 5:40 PM
Share

बिहार विधानसभा निवडणुकीसंदर्भात आज निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये बिहार विधानसभा निवडणुकीसंदर्भातील महत्त्वाच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. बिहार विधानसभेची निवडणूक दोन टप्प्यांमध्ये होणार आहे. 6 नोव्हेंबर आणि 11 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर 14 नोव्हेंबरला निवडणूक निकालाची घोषणा करण्यात येणार आहे. बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण 243 जागा आहेत, सध्या सुरू असलेल्या विधानसभेचा कार्यकाळ हा 22 नोव्हेंबरला संपणार आहे, मात्र त्यापूर्वीच बिहारमध्ये आता नवं सरकार अस्तित्वात येण्याची शक्यता आहे.

निवडणूक आयोगानं काय म्हटलं?

निवडणूक आयोगाकडून बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे, येत्या 6 नोव्हेंबर आणि 11 नोव्हेंबर रोजी बिहार विधानसभेसाठी मतदान होणार आहे. बिहार विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात होणार आहे. तर 14 नोव्हेंबरला निवडणूक निकालाची घोषणा होणार आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या वतीनं देण्यात आली आहे. बिहारच्या निवडणुका या सुरळीत आणि पूर्णपणे पारदर्शकतेनं पार पाडण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. या काळात प्रसारित होणाऱ्या फेक न्यूज, आणि पसरवण्यात येणाऱ्या अफवांवर निवडणूक आयोगाचं बारीक लक्ष असणार आहे, त्याची गांभीर्यानं दखल घेतली जाईल. या काळात कुठल्याही प्रकारचा हिंसाचार सहन केला जाणार नाही.

बिहार विधानसभेमध्ये एकूण 243 जागा आहेत, त्यापैकी 203 जागा या सर्वसामान्य प्रवर्गासाठी आहेत, तर एससी साठी 38 आणि एसटी साठी दोन जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. बिहारमध्ये 3.92 कोटी पुरुष मतदार आहेत, तर 3.40 महिला मतदार आहेत. तर 14 लाख मतदार हे आपला मतदानाचा हक्क पहिल्यांदाच बजावणार आहेत. बिहारमध्ये 14 हजार मतदार असे देखील आहेत, ज्यांचं वय हे 100 वर्षांपेक्षा जास्त आहे अशी माहिती देखील यावेळी निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. प्रत्येक मतदार केंद्रावर जास्तीत जास्त 1200 मतदार असतील असंही यावेळी निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.

महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.