AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिहार विधानसभा निवडणुकीबाबत मोठी बातमी, NDA चं जागावाटप जाहीर, भाजप किती जागा लढणार?

NDA Seat Sharing for Bihar Election: बिहार विधानसभा निवडणुकीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. एनडीएचा जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर झाला आहे. नवी दिल्लीत झालेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर भाजप 101 जागा आणि जेडीयू 101 जागा लढवणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीबाबत मोठी बातमी, NDA चं जागावाटप जाहीर, भाजप किती जागा लढणार?
bihar nda seat sharing
| Updated on: Oct 14, 2025 | 5:39 PM
Share

बिहार विधानसभा निवडणुकीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. एनडीएचा जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर झाला आहे. नवी दिल्लीत झालेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर भाजप 101 जागा आणि जेडीयू 101 जागा लढवणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. चिराग पासवान यांचा एलजेपी (आर) हा पक्ष 29 जागा, उपेंद्र कुशवाह यांचा आरएलएम पक्ष 6 जागा आणि जितन राम मांझी यांचा एचएएम पक्ष 6 जागा लढवणार आहे.

सोशल मीडियाद्वारे घोषणा

एनडीएच्या जागावाटपाची घोषणा युतीतील नेत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत केली आहे. जेडीयूचे कार्यकारी अध्यक्ष संजय झा, आरएलएमचे प्रमुख उपेंद्र कुशवाह, केंद्रीय मंत्री चिराग पासवान आणि बिहार भाजपचे अध्यक्ष दिलीप जयस्वाल यांच्यासह इतर नेत्यांनी जागावाटपाबाबत सोशल मीडियावर माहिती दिली.

उमेदवारांच्या नावांची घोषणा होणार

एनडीएचे जागावाटप जाहीर झाल्यानंतर आता युतीतील पक्षांकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा व्हायला सुरुवात होणार आहे. भाजपची यादी जवळजवळ निश्चित आहे. रविवारी संध्याकाळी दिल्लीत पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड (जेडीयू) ने देखील आपले उमेदवारांची यादी फायनल केली आहे. याची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.

बिहार विधानसभा निवडणूकीचे वेळापत्रक

बिहार विधानसभेची निवडणूक दोन टप्प्यांमध्ये होणार आहे. 6 नोव्हेंबर आणि 11 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर 14 नोव्हेंबरला निवडणूक निकालाची घोषणा करण्यात येणार आहे. बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण 243 जागा आहेत, सध्या सुरू असलेल्या विधानसभेचा कार्यकाळ हा 22 नोव्हेंबरला संपणार आहे, मात्र त्यापूर्वीच बिहारमध्ये आता नवं सरकार अस्तित्वात येण्याची शक्यता आहे.

बिहार विधानसभेमध्ये एकूण 243 जागा आहेत, त्यापैकी 203 जागा या सर्वसामान्य प्रवर्गासाठी आहेत, तर एससी साठी 38 आणि एसटी साठी दोन जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. बिहारमध्ये 3.92 कोटी पुरुष मतदार आहेत, तर 3.40 महिला मतदार आहेत. तर 14 लाख मतदार हे आपला मतदानाचा हक्क पहिल्यांदाच बजावणार आहेत. बिहारमध्ये 14 हजार मतदार असे देखील आहेत, ज्यांचं वय हे 100 वर्षांपेक्षा जास्त आहे अशी माहिती देखील निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.

RSS स्वयंसेवकाचं मनसेत काय काम? पिट्याभाईला राज ठाकरेंनी खडसावलं!
RSS स्वयंसेवकाचं मनसेत काय काम? पिट्याभाईला राज ठाकरेंनी खडसावलं!.
जरांगेंना ठार मरण्यासाठी 3 प्लॅन! जरांगेंनी सांगितला A टू Z घटनाक्रम
जरांगेंना ठार मरण्यासाठी 3 प्लॅन! जरांगेंनी सांगितला A टू Z घटनाक्रम.
भास्कर जाधवांच्या मुलानं योगेश कदमांच्या कार्यकर्त्याला धुतलं अन्...
भास्कर जाधवांच्या मुलानं योगेश कदमांच्या कार्यकर्त्याला धुतलं अन्....
लोणार सरोवरातील खारं पाणी झालं गोडं! मासे दिसल्यानं जैवविविधता धोक्यात
लोणार सरोवरातील खारं पाणी झालं गोडं! मासे दिसल्यानं जैवविविधता धोक्यात.
'तो' मुंडेंचा PA, त्यानं मला ठार... जरांगेंच्या आरोपांनी राज्य हादरले
'तो' मुंडेंचा PA, त्यानं मला ठार... जरांगेंच्या आरोपांनी राज्य हादरले.
मनसे कार्यकर्त्यांकडून विहिरीत उतरून मतदारांचा शोध अन् अनोखं आंदोलन
मनसे कार्यकर्त्यांकडून विहिरीत उतरून मतदारांचा शोध अन् अनोखं आंदोलन.
1800 कोटीची जमीन 300 कोटीत, स्टॅम्प ड्युटीही माफ! पार्थ पवारांवर आरोप
1800 कोटीची जमीन 300 कोटीत, स्टॅम्प ड्युटीही माफ! पार्थ पवारांवर आरोप.
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, दादांनी झटकले हात अन् म्हणाले...
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, दादांनी झटकले हात अन् म्हणाले....
जरांगेंच्या हत्येचा कट, अडीच कोटींची सुपारी अन् बड्या नेत्याचं नाव
जरांगेंच्या हत्येचा कट, अडीच कोटींची सुपारी अन् बड्या नेत्याचं नाव.
'वंदे मातरम्' गीताला 150 वर्ष पूर्ण, मंत्रालयात विशेष कार्यक्रम
'वंदे मातरम्' गीताला 150 वर्ष पूर्ण, मंत्रालयात विशेष कार्यक्रम.