AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mohammad Shahabuddin | तिहार तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या माजी खासदाराचा कोरोनाने मृत्यू

बिहारचा बाहुबली नेता अशी ओळख असलेला मोहम्मद शाहबुद्दीन तिहार जेलमध्ये हत्या प्रकरणात शिक्षा भोगत होता (Mohammad Shahabuddin Tihar Jail Corona)

Mohammad Shahabuddin | तिहार तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या माजी खासदाराचा कोरोनाने मृत्यू
बिहारचा बाहुबली नेता मोहम्मद शाहबुद्दीन
| Updated on: May 01, 2021 | 9:16 AM
Share

नवी दिल्ली : राष्ट्रीय जनता दलाचा माजी खासदार मोहम्मद शाहबुद्दीन (Mohammad Shahabuddin) याचे निधन झाले. दिल्लीतील दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याने अखेरचा श्वास घेतला. बिहारचा बाहुबली नेता अशी ओळख असलेला मोहम्मद शाहबुद्दीन तिहार जेलमध्ये हत्या प्रकरणात शिक्षा भोगत होता. (Bihar Former MP Mohammad Shahabuddin locked up in Tihar Jail Dies of Corona)

कोरोनाची लागण झाल्यानंतर माजी खासदार मोहम्मद शाहबुद्दीन याला मंगळवारी रात्री दिल्लीतील दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दिल्ली हायकोर्टाने राज्य सरकार आणि तिहार जेल प्रशासनाला मोहम्मद शाहबुद्दीन याला वैद्यकीय निगराणीखाली योग्य उपचार देण्याचे आदेश दिले होते. मात्र उपचारादरम्यान शनिवारी सकाळी त्याचे निधन झाले.

बिहारचा बाहुबली नेता

गँगस्टर ते खासदार असा राजकीय प्रवास असलेला मोहम्मद शाहबुद्दीन सध्या दिल्लीतील तिहार तुरुंगात हत्या प्रकरणामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. शाहबुद्दीन हा बिहारमधील सीवन मतदारसंघातून राजदच्या तिकीटावर लोकसभा खासदार होता. त्याच्याविरोधीत तीन डझनपेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. 15 फेब्रुवारी 2018 रोजी सुप्रीम कोर्टाने त्याला बिहारच्या सीवन तुरुंगातून तिहार तुरुंगात नेण्याचे आदेश दिले होते.

वडिलांच्या निधनानंतरही पॅरोल नाही

गेल्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात त्याचे पिता शेख मोहमद हसीबुल्लाह यांचं वयाच्या 90 व्या वर्षी निधन झालं होतं. त्यावेळी त्याला पॅरोलवर बाहेर जाण्याची परवानगी मिळाली नव्हती.

कैद्यांशी संपर्क नाही

तिहार तुरुंगातील सेलमध्ये एकट्यालाच कैद केलेला मोहम्मद शाहबुद्दीन हा हायप्रोफाईल कैदी मानला जात होता. इतर कैद्यांसोबत तो कमीत कमी काळ संपर्कात येत असे. गेल्या 20-25 दिवसात तो कुठल्या नातेवाईकालाही भेटला नव्हता.तरीही त्याला कोरोनाची लागण झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

काही दिवसांपूर्वीच तिहार तुरुंगातील आणखी एक हायप्रोफाईल कैदी आणि गँगस्टर छोटा राजनलाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. छोटा राजनही शाहबुद्दीनप्रमाणेच तिहार तुरुंगातील सेलमध्ये एकटाच कैद होता. (Bihar Former MP Mohammad Shahabuddin locked up in Tihar Jail Dies of Corona)

संबंधित बातम्या :

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला तिहार तुरुंगात कोरोना, ‘एम्स’मध्ये दाखल

(Bihar Former MP Mohammad Shahabuddin locked up in Tihar Jail Dies of Corona)

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.