बिहारच्या या गावात अरबपती बिल गेट्सची मुलगी राहते, गरिबीमुळे शाळेत जाणंही कठीण

बिहारच्या या गावात अरबपती बिल गेट्सची मुलगी राहते, गरिबीमुळे शाळेत जाणंही कठीण
Bill Gates Daughter in Bihar

बिहारची राजधानी पाटणा येथील दानापूरच्या जमसौत मुसहरी गावात मायक्रोसॉफ्टचे (Billionaire Bill Gates Daughter Lives In Bihar) संस्‍थापक अरबपती बिल गेट्स यांची मुलगी राहते.

Nupur Chilkulwar

|

Feb 26, 2021 | 3:49 PM

पाटणा : बिहारची राजधानी पाटणा येथील दानापूरच्या जमसौत मुसहरी गावात मायक्रोसॉफ्टचे (Billionaire Bill Gates Daughter Lives In Bihar) संस्‍थापक अरबपती बिल गेट्स यांची मुलगी राहते. 11 वर्षांच्या राणी कुमारीला एक दशकापूर्वी गावात आलेल्या बिल गेट्स दम्पत्तीने दत्तक घेत आपल्या मुलीप्रमाणे असल्याचं सांगितलं होतं. तेव्हा ती एका वर्षाची होती. राणी सांगते की तिला शिकायचं आहे, पण ती शिकू शकत नाही. तर गावातील जास्तकरुन गावकरी हे अशिक्षित आहेत (Billionaire Bill Gates Daughter Lives In Bihar).

राणीला काहीही माहिती नाही, तिला काही विचारलं की ती फक्त हसते, काहीही बोलत नाही. गावात पिढीसाठी एक सरकारी प्राथमिक शाळा आणि एक अंगनवाडी केंद्र आहे. गावातील लोक सांगतात की 23 मार्च 2011 ला बिल गेट्स आपल्या पत्नीसोबत गावात आले होते आणि त्यांनी राणी कुमारीला मुलगी मानलं होतं. तिला कुशीत घेऊन तिचा लाडही केला होता. गावातील विकासाबाबतही सांगितलं होतं. पण, येथून गेल्यावर आजपर्यंत नाही बिल गेट्स येथे आलेत नाही त्यांच्या संस्थेचं कुणी आलं. आज राणी आणि तिचं कुटुंब आर्थिक संकटात आहे.

राणीला दत्तक घेतलं

राणी शाळेत जाऊ शकत नाहीये. पण, मिलिंडा गेट्स फाउंडेशनने कुठलीही दखल घेतलेली नाही. दानापूरच्या जमसौत निवासी राणी कुमारी आता जवळपास 11 वर्षांची झाली आहे. राणीची आई कुंती देवीला आजही तो दिवस स्मरणात आहे जिव्हा त्यांच्या चिमुकल्या मुलीलला गेट्स दाम्पत्याने दत्तक घेतलं होतं. कुंती देवी सांगतात की अमेरिकेचे लोक आमच्या घरी आले होते आणि आमच्या मुलीला दत्तक घेतलं. ते काय बोलत होते आम्हाला काहीही कळत नव्हते. पण, त्यानंतर ते एकदाही इथे आले नाही (Billionaire Bill Gates Daughter Lives In Bihar).

2010 मध्ये बिल गेट्स फाउंडेशन आणि बिहार सरकारमध्ये स्वास्थ्य सुधारसाठी एक करार झाला होता. या कराराअंतर्गत भारतात आलेल्या बिल गेट्स दाम्पत्य दानापूरच्या जमसौत वस्तीत पोहोचले होते.

Billionaire Bill Gates Daughter Lives In Bihar

संबंधित बातम्या :

Bill Gates | बिल गेट्स यांच्याकडून भारताचं अभिनंदन, कोरोना लसीकरणावर म्हणाले..

कोरोना पुढील काळात आणखी धोकादायक, परिस्थिती बिघडू शकते, बिल गेटस यांचा इशारा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें