AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोनार बांगलाच्या नावाखाली जनेतशी छळ, ही निवडणूक म्हणजे…धर्मेंद्र प्रधान यांची तृणमूलवर सडकून टीका!

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारवर सडकून टीका केली.

सोनार बांगलाच्या नावाखाली जनेतशी छळ, ही निवडणूक म्हणजे...धर्मेंद्र प्रधान यांची तृणमूलवर सडकून टीका!
dharmendra pradhanImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 28, 2026 | 5:07 PM
Share

West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. या निवडणुकीमुळे तेथील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आपली सत्ता कायम राखण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर तृणमूल काँग्रेसच्या काळात पश्चिम बंगालमध्ये मोठे अराजक निर्माण झाले आहे, असा आरोप भाजपाकडून केला जातोय. काहीही झालं तरी यावेळी तेथे सत्तापालट करून भाजपाचा मुख्यमंत्री करण्यासाठी तेथे भाजपा पक्ष पूर्ण ताकदीने उतरला आहे. बंगालच्या निवडणुकीत राष्ट्रीय नेत्यांनीही लक्ष घातले आहे. दरम्यान, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आक्रमक होत पश्चिम बंगालमधील सध्या सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसवर सडकून टीका केली. बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्त्वातील सरकारमध्ये अराजकता निर्माण झाली आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला.

राजकीय हिंसा, घुसखोरी यांना…

“पश्चिम बंगालमध्ये गेल्या 15 वर्षांपासून भ्रष्टाचार, लांगुलचालन, राजकीय हिंसा, घुसखोरी यांना संरक्षण देणारे सरकार कार्यरत आहे. हिंसा, घुसखोरी, लांगुलचालन तेथे राजकीय व्यवस्थेचा भाग झाले आहे. पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्त्वातील सरकार हे अविश्वास, अराजकता, भय याचे दुसरे रुप झाले आहे. जनतेचा विश्वास पूर्णपणे उडाला आहे,” असा हल्लाोबल धर्मेंद्र प्रधान यांनी केला.

सरकारच्या ढिसाळ धोरणामुळे…

तसेच, पश्चिम बंगालमधील विधानसभेची निवडणूक ही फक्त सत्ता परिवर्तनाचा भाग नाीही, तर ही निवडणूक म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा झाली आहे. पश्चिम बंगालच्या सीमा या देशाच्या सुरक्षेशी निगडित आहेत. पश्चिम बंगालमधील सरकारच्या ढिसाळ धोरणामुळे हा विषय जास्तच गंभीर झाला आहे. ‘सोनार बांग्ला’च्या नावाखाली सिंडिकेट, भ्रष्टाचार, लाचखोरी यासारख्या कुशासनाच्या माध्यमातून लोकांना छळले जात आहे, अशीही टीका त्यांनी केली.

तृणमूल काँग्रेसच्या सत्तेमुळे पश्चिम बंगाल खूप…

पश्चिम बंगालमध्ये महिलांविरोधातील गुन्ह्यांत वाढ होत आहे. युवक बेरोजगार युवक, हतबल शेतकरी, कोडमडलेली आरोग्य व्यवस्ता, घसरत चाललेला साक्षरता दर तसेच प्रत्येक क्षेत्रातील अपयश हीच बंगालची ओळख होत आहे. तृणमूल काँग्रेसच्या सत्तेमुळे पश्चिम बंगाल खूप मागे गेला आहे, असेही मत त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये व्यक्त केले.

Follow Us
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ